

nutritionist recommended superfoods for women
Sakal
women’s health diet for balanced hormones: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांवर घर, करिअर आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा ताण अधिक असतो. याचा थेट परिणाम त्यांच्या हार्मोनल संतुलनावर, ऊर्जा पातळीवर आणि एकूणच आरोग्यावर दिसून येतो. हार्मोन्स असंतुलित झाल्यास थकवा, मूड स्विंग्स, वजन वाढ, पिंपल्स, अनियमित पाळी, केसगळती अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स नैसर्गिकरीत्या संतुलित ठेवणारा आहार घेणे गरजेचे असते. न्यूट्रिशनिस्ट यांनी पुढील पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.