Fathers Day 2023 : वडिलांचे वय ५० च्या वर असेल, तर हे पदार्थ त्यांच्या डाएटमध्ये असणं अत्यावश्यक

तसातर प्रत्येकच दिवस वडिलांना समर्पित असतो. पण जून महिन्यात खास फादर्स डे साजरा होतो.
Fathers Day 2023
Fathers Day 2023esakal

Things Must Be Include In 50 Plus Father's Diet : प्रत्येकच वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. तसं तर प्रत्येकच दिवस आई-वडिलांना समर्पित असतो. पण आपल्या खास भावना या खास दिवसानिमित्त व्यक्त करण्याची एक संधी आपल्याला मिळते. हा दिवस पहिले फक्त परदेशात साजरा होत असे. पण आता भारतातही मोठ्याप्रमाणात साजरा होतो.

वय वाढतं तसे शरीरीत बरेच बदल होत असतात. विशेषतः ५० वर्षानंतर शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरल्सची विशेष आवश्यकता असते. याच्या कमीमुळे शरीरात बऱ्याच प्रकारचे नुकसान होते. या फादर्स डे निमित्त त्या पोषक तत्वांविषयी जाणून घेऊया, जे तुमच्या वडिलांच्या डाएटमध्ये असायलाच हवे.

Fathers Day 2023
Fathers Day 2023esakal

कॅल्शियम - वाढत्या वयात शरीर जेवढे मिनरल्स शोषतं त्यापेक्षा जास्त ते कमी होऊ लागते. त्यामुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. महिलांमध्ये हा आजार मनोपॉजमध्ये जास्त आढळतो. कॅल्शियम स्नायू, नसा, पेशी आणि रक्त वाहिन्यांना नीट काम करण्यासाठी मदत करतात. याचा बहुतांश भाग जेवणातून मिळतो. ५० च्या वरील स्त्री पुरुषांनी इतरांपेक्षा २० टक्के जास्त कॅल्शियम घ्यायला हवे. डाएटमध्ये दूध, दही आणि पनीर नक्की घ्या.

व्हिटॅमिन B12 - यामुळे रक्त आणि तांत्रिक पेशी बनण्यासाठी मदत मिळते. नैसर्गिक पद्धतीने हे मांस, मासे, अंडे आणि डेअरी प्रॉडक्टपासून मिळवता येते. औषधे आणि B12 फोर्टिफाइड फूड द्वारा मिळवता येते. ५० पेक्षा जास्त वयाच्या ३० टक्के लोकांना एट्रोफिक गॅस्ट्रिट होतो. ज्यामुळे शारीराला हे खाद्य पदार्थातून शोषणे कठीण होते. त्यामुळे तुम्ही सप्लिमेंटद्वारा हे घेऊ शकतात.

Fathers Day 2023
Fathers Day 2023 : फादर्स डे साजरा करण्यासाठी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारचीच निवड का करण्यात आली?
Fathers Day 2023
Fathers Day 2023esakal

व्हिटॅमिन डी - व्हिटॅमिन डी स्नायू, नसा आणि इम्यून सिस्टीमला नीट काम करायला मदत करते. बहुतांश लोकांना व्हिटॅमिन डी काही प्रमाणात सुर्यप्रकाशातून मिळते. पण वय जसे वाढते तशी शरीराची सूर्य प्रकाशातून व्हिटॅमिन डी घेण्याची क्षमता कमी होते. अन्नातून व्हिटॅमिन डी जास्त मिळत नाही. पण सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन सारखे फॅटी फिश याचे उत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन B6 - व्हिटॅमिन B6 शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि एनर्जी वाढवण्यात मदत करते. हे मुलांची बुद्धमत्त वाढवण्याचं काम करते. वाढत्या वयाबरोबर शरीरात या व्हिटॅमिनची गरज वाढत जाते. काही अभ्यासामध्ये हे आढळले आहे की, ज्या ज्येष्ठांमध्ये व्हिटॅमिन B6 चांगल्याप्रमाणात असते, त्यांची स्मरणशक्ती चांगली राहते. चणे, छोले, फॅटी फीश आणि फोर्टीफाइड ब्रेकफास्ट याचा चांगला स्रोत आहे.

Fathers Day 2023
Father's Day : वडिलांना गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट गॅजेट्स
Fathers Day 2023
Fathers Day 2023esakal

मॅग्नेशियम - हे तुमच्या शरीरात प्रोटीन आणि हाडे बनवण्यासाठी मदत करते. सोबतच हे ब्लड शुगरपण स्थीर ठेवते. हे नट्स, बीया, पालेभाज्या यांच्यात आढळते. वय वाढीबरोबर बहुतांश लोकांना वेगवेगळ्या आजारांसाठी औषधे घेण्याची गरज पडते. यामुळेही शरीरात मॅग्नेशियमची कमतरता होते.

प्रोबायोटिक्स - हे बॅक्टेरीया आतड्यांसाठी चांगले असतात. हे दही, सॉकरक्राटसारख्या फर्मेंटेड फूडमधून मिळते. याच्या सप्लिमेट्सपण मिळतात. डायरीया, खराब पचनतंत्र आणि विविध प्रकारच्या अॅलर्जीपासून ते वाचवते. जर तुम्हा हेल्दी असाल तर हे घेणे पूर्णपणे सुरक्षित असते. पण रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांनी हे घेण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Fathers Day 2023
Father's Day : वडिलांसाठी असा करा खास प्लॅन, आयुष्यभर राहील लक्षात
Fathers Day 2023
Fathers Day 2023esakal

ओमेगा 3 - हे फॅटी अॅसिड फार आवश्यक मानले जाते, कारण शरीर ते बनवू शकत नाही. डोळे, मेंदू आणि स्पर्म सेल्ससाठी ओमेगा ३ फार आवश्यक असते. हे अल्झायमर, संधीवात आणि डोळ्यांच्या आजारापासून वाचवते. यासाठी डाएटमध्ये फॅटी फिश, अकरोड, कॅनोल ऑइल किंवा जवसाचा समावेश असावा.

झिंक - बहुतांश लोकांमध्ये झिंकची कमतरता असते. हे वास आणि चव घेण्याची क्षमता वाढवते. सोबतच संसर्ग आणि इंफ्लेमेशनशी लढायला मदत करते. वाढत्या वयात शरीराचे सर्व आवश्यक कार्य झिंकच्या माध्यमाने शक्य होतात. मांसाहार आणि फोर्टीफाइड फूड याचा चांगला स्रोत आहे.

Fathers Day 2023
Fathers Day 2023esakal

पोटॅशियम - हृदय, किडनी, स्नायू आणि नसांसाठी पोटॅशियम फार आवश्यक आहे. हे स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर आणि ऑस्टिओपोरोसिसपासून वाचवते. वाळलेलं जर्दाळू, केळं, पालक, दूध आणि दही याचे चांगले स्रोत आहेत. याचे सप्लिमेंट घेण्याआधी आपल्या डॉक्टरशी संपर्क साधा.

फायबर - वय वाढू लागले की सोबत फायबर शरीरासाठी जास्त आवश्यक होऊ लागते. फायबर स्ट्रोकच्या धोक्यापासून वाचवते, पोट साफ ठेवते, कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगरला कंट्रोल करते. ५० वर्षांवरील महिलांना कमीत कमी दिवसाला २१ ग्रॅम तर पुरुषांना ३० ग्रॅमची आवश्यकता असते. संपूर्ण धान्य आणि भाज्यांमधून हे मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com