World First Aid Day 2024: प्रथमोपचार किटमध्ये कोणते साहित्य असावे? वाचा एका क्लिकवर

World First Aid Day 2024: दरवर्षी १४ सप्टेंबरला प्रथमोपचार दिवस साजरा केला जातो. प्रत्येकाला प्रथमोपाचार किटबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
World First Aid Day 2024:
World First Aid Day 2024:Sakal
Updated on

World First Aid Day 2024: दरवर्षी १४ सप्टेंबरला प्रथमोपचार दिवस साजरा केला जातो. प्रथमोपचार म्हणजे दुखापत किंवा अपघात झाल्यास डॉक्टरांकडे नेण्यापुर्वी केलेले उपचार होय. प्रत्येकाला प्रथमोपाचार किटबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रथमोपचार दिवस साजारा केला जातो. जागतिक प्रथमोपचार दिवसाची सुरूवात २००० मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीजद्वारे झाली. तसेच प्रथमोपचार प्रत्येकाला करता आले पाहिजे यासाठी प्रोत्साहन देते.

थीम कोणती आहे?

या वर्षीच्या जागतिक प्रथमोपचार दिनाची थीम "प्रथमोपचार आणि खेळ" अशी आहे. ज्याचा उद्देश खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये प्रथमोपचाराची भूमिका किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देणे हा आहे.

World First Aid Day 2024:
Simple Door Hacks: दरवाजा उघडताना अन् बंद करताना करकर आवाज येतोय ? मग 'या' सोप्या हॅक्सची घ्या मदत

प्रथमोपचार पेटीमध्ये पुढील गोष्टी असाव्यात

सामान्य वैद्यकीय साहित्य

रबराचे हातमोजे

छोटा चिमटा

सुई

स्वच्छ आणि सुके कापडाचे तुकडे

कापुस

अँटीसेप्टिक यामध्ये डेटॉल किंवा सॅव्हलॉन

थर्मामीटर

पट्रोलियम जेली

जखम कमी करण्यासाठी

मिश्रित बँड-एड्स

गॉझ पॅड (2-3)

गॉझ रोल (1)

बँडेज पट्टी (1 रोल)

जखम स्वच्छ करण्यासाठी

अँटिसेप्टिक वाइप्स

प्रतिजैविक मलम

फोड आणि जळजळ कमी करण्यासाठी

कोरफड जेल किंवा बर्न क्रीम

बर्न जेल

मोलेस्किन

इतर गोष्टी

चिमटा

कात्री

थर्मामीटर

फ्लॅशलाइट किंवा बॅटरी

शिट्टी (आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी सिग्नल देण्यासाठी वापरू शकता)

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

  • प्रथमोपचार पेटीमधील सर्व साहित्य कालबाह्य झालेले नसावे.

  • वापरल्या गेलेल्या किंवा संपत आलेल्या वस्तू घरात आणून ठेवाव्या.

  • किट सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com