
esakal
Kidney Failure Symptoms : मूत्रपिंड (किडनी) आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. तो रक्तदाब नियंत्रित करणे, रक्तातील लाल पेशी तयार करणे आणि शरीरातील पाणी व खनिजांचे संतुलन राखणे अशी अनेक कामे करतो. मात्र, किडनीच्या समस्येकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, काही लक्षणे किडनी खराब होत असल्याचे संकेत देतात. ही लक्षणे वेळीच ओळखून उपचार केल्यास मूत्रपिंडाचे आजार टाळता येऊ शकतात.