Food Poisoning Prevention Tips: एक्सपायरी डेट संपलेले इन्स्टंट नूडल्स खाणं योग्य की अयोग्य? फूड पॉइझनिंगच्या घटनांनंतर तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Food Poisoning Cases: इन्स्टंट नूडल्स खरेदी करण्यापूर्वी एक्सपायरी डेट आणि पॅकेजिंग का तपासणं आवश्यक आहे? फूड पॉइझनिंगपासून बचावासाठी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला जाणून घ्या.
Is It Safe to Eat Expired Instant Noodles? Experts Explain the Health Risks

Is It Safe to Eat Expired Instant Noodles? Experts Explain the Health Risks

sakal

Updated on

फक्त २-३ मिनिटांत तयार होणारे इन्स्टंट नूडल्स हे लहान मुलांपासून तरुणांपर्यंत बऱ्याच जणांचं आवडतं फास्ट फूड आहे. रात्री उशिरा भूक लागली, ऑफिसच्या घाईत काहीतरी पटकन खायचं असेल किंवा पावसाळ्यात गरमागरम नूडल्सची इच्छा झाली की हात आपोआप नूडल्सच्या पॅकेटकडे जातो. पण हेच नूडल्स जर एक्सपायरी डेट संपलेले असतील, तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अलीकडे भारतात एक्सपायरी डेट संपलेल्या इन्स्टंट नूडल्समुळे फूड पॉइझनिंगची दोन गंभीर प्रकरणे समोर आल्यानंतर या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी नूडल्स खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com