सद्गुरू : बऱ्याच लोकांसाठी, त्यांच्या बहुतेक प्रतिक्रिया या फक्त असहाय प्रतिक्रिया असतात. अनेकदा तुम्ही स्वतःला सांगता, ‘पुढच्या वेळी मी अशी प्रतिक्रिया देऊ नये.’ पण पुढच्या वेळी, प्रतिक्रिया अधिक तीव्र होते. विशेषतः जेव्हा तुम्ही स्वतःला सांगत फिरता, ‘मला प्रतिक्रिया द्यायची नाही, मला प्रतिक्रिया द्यायची नाही,’ तेव्हा तुम्ही एक संपूर्ण प्रतिक्रिया बनता.