

Health Checkup Warning: Why Excessive Blood Testing Can Lead To Anxiety And Anemia
esakal
Blood Test Awareness: आजकाल फिटनेस आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे अनेकजण वारंवार हेल्थ चेकअप किंवा ब्लड टेस्ट पॅकेजेसची निवड करतात. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, थायरॉईड, HbA1c, कोलेस्ट्रॉल आणि कम्प्लीट ब्लड काउंट (CBC) यांसारख्या चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा पुन्हा केल्या जातात. पण, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्पष्ट कारणाशिवाय वारंवार रक्त तपासणी करणे आरोग्यासाठी फायद्याचे नसून त्रासदायक ठरू शकते.