Fruits For Diabetes Patient : मधुमेहाच्या रूग्णांसाठी नेमकी कोणती फळे फायद्याची? इथे वाचा संपूर्ण यादी

फायबरयुक्त फळांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते
Fruits For Diabetes Patient
Fruits For Diabetes Patientesakal

-विकास सिंह

मधुमेह ही एक वैद्यकीय स्थिती असून त्यासाठी व्यक्तींना त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलण्याची आवश्यकता असते. त्यात काही फळांचाही समावेश होतो. फळे खाण्याची आवड असल्याने आणि तो संतुलित आहाराचा देखील एक भाग असल्याने, जिभेचे चोचले पुरवताना मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी फळांचे काय महत्त्व आहे हे बघूया.

फायबर : फळांमधील फायबर साखरेचे शोषण कमी करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते. फायबर समृद्ध फळे सुधारित इन्सुलिन संवेदनशीलतेशी जोडली गेली आहेत. ते रक्तप्रवाहात ग्लुकोजचे प्रमाण स्थिर करतात, परिणामी तुमची ऊर्जा पातळी कायम राहते. फायबरयुक्त फळांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आणि मधुमेहाशी संबंधित अधिक विकार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

कार्बोहायड्रेट्स असलेले अन्न त्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्स(GI)नुसार एकतर हळूहळू किंवा पटकन पचले जाते. कार्बोहायड्रेट्सचे जलद पचन झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी काही कालावधीत वाढू शकते. मंद गतीने पचणारी कोणतीही फळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने खाणे चांगले असते.

नैसर्गिक साखर (किमान प्रक्रिया केलेले पदार्थ) : मधुमेहींसाठी साखर किंवा जास्त साखरेचे पदार्थ खाण्यास प्रतिबंध आहे. मधुमेहाच्या व्यवस्थापनासोबत या इच्छा पूर्ण करण्यासाठी फळे स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय असतात.

चेरी : चेरीमध्ये चरबी कमी असते आणि व्हिटॅमिन ‘सी’चा चांगला स्रोत असतो. चेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. चेरी इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतात. चेरीच्या सेवनाने रक्ताभिसरण निरोगी राहते.

संत्रे : हे लिंबूवर्गीय फळ असून अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत. ते मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. ते हळूहळू पचत असल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने हायड्रेशनला प्रोत्साहन देऊन पचनमार्गातून साखरेचे शोषण कमी करते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकते. (Health)

Fruits For Diabetes Patient
Diabetes असलेल्यांना हे गंभीर आजार होण्याचा असतो धोका, वेळीच व्हा सावधान

सफरचंद : फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारख्या पोषक घटकांमुळे मधुमेहासाठी सफरचंद फायदेशीर ठरू शकतात. फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असण्याव्यतिरिक्त, सफरचंद चघळल्याने लाळेचे उत्पादन वाढते. ते तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत करते. (Diabetes)

किवी : किवी हे एक लहान हिरवे किंवा तपकिरी फायबरयुक्त फळ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते. किवीमध्ये ॲक्टिनिडिनसारखे एन्झाइम असतात. ते पचनास मदत करतात. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये त्वचेशी संबंधित विविध समस्या असतात. त्यावर मात करण्यासाठी किवी हा सर्वोत्तम पर्याय बनतो.

Fruits For Diabetes Patient
Health Tips : पाणी पिताना ही चूक कराल तर आयुष्यातील पंधरा वर्ष होतील कमी!  

या फळांव्यतिरिक्त द्राक्ष, प्लम आणि पीच देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी खाणे चांगले आहे. फळे खाण्याबरोबर नियमित चालणे महत्त्वाचे आहे. चालण्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते, आणि फळे खाण्याचे फायदे वाढतात. त्यामुळे रोज एक फळ खा, चालत राहा आणि तुम्हाला मधुमेह असला तरी आनंदी जगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com