Gallstones Causes Symptoms
sakal
- डॉ. मालविका तांबे
'डॉक्टर, सकाळी उठले आणि चेहऱ्यावरती एकाएकी सूज आली आणि डोळे तर उघडतच नाहीयेत. पावसाळा सुरू झाला की मला संपूर्ण अंगावरती रात्रीच्या वेळेला एकाएकी खाज सुटते. सगळीकडे लाल गांधी येतात आणि त्वचा भाजल्यासारखी वाटायला लागतं’, असं सांगणारे रुग्ण पावसाळ्याच्या काळात फार प्रमाणात वाढतात. बोलीचालीच्या भाषेमध्ये पित्ताच्या गांधी म्हणजे शरीरावरती एखादा किडा किंवा मुंगी चावल्यानंतर त्वचा जशी लाल होते, सुजते तशा प्रकारचा त्रास होताना दिसतो. काही लोकांना सुई टोचल्यासारखी वेदना जाणवते.