
थोडक्यात:
व्हिटॅमिन B12 लाल रक्तपेशी, डीएनए सिंथेसिस आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता जास्त प्रमाणात आढळते कारण त्याचे मुख्य स्रोत मांसाहारातून मिळतात.
काही फळे व भाज्या पूरक प्रमाणात व्हिटॅमिन B12 देऊन ही कमतरता कमी करण्यास मदत करतात.
Vegetarian Food Options For Vitamin B12: शरीरामधील काही कार्य योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी आपल्याला अनेक जीवनसत्त्वांची गरज असते. त्यापैकीच एक म्हणजे व्हिटॅमिन B12. हे शरीरातील लाल रक्तपेशी, डीएनए सिंथेसिस आणि मज्जासंस्थेच्या कामात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थकवा, ऍनिमिया, श्वासोच्छ्वासास त्रास होणे तसेच इतर मज्जासंस्थेशी निगडित समस्या होण्याची शक्यता उद्भवू शकते.