
मधुमेहग्रस्तांना दिलासा स्वस्त औषध ‘सीटाग्लिप्टीन’ बाजारात
नवी दिल्ली : ‘सीटाग्लिप्टीन’ नावाचे मधुमेहावरील स्वस्त औषध केंद्रीय रसायन मंत्रालयाने बाजारात आणले आहे. या औषधाच्या दहा गोळ्यांची किंमत ६० रुपये असेल. हे औषध देशातील सर्वच जेनरिक औषधांच्या दुकानात उपलब्ध असेल.
केंद्रीय रासायनिक व खत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाईस ब्युरो ऑफ इंडियाने (पीएमबीआय) सीटाग्लिप्टीन तसेच इतर मिश्रणाचे नवीन औषण जनऔषधी केंद्रात उपलब्ध करवून दिले. सीटाग्लिप्टीन फॉस्फेटच्या ५० मिलीग्रामच्या (एमजी) १० गोळ्या ६० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
तर, सीटाग्लिप्टीन आणि मेटफॉर्मिन हरायड्रोक्लोराईडचे ५० एमजी किंवा ५०० एमजी प्रमाण असलेल्या मिश्रणाच्या १० गोळ्या ६५ रुपयांना तर, ५० एमजी किंवा १००० एमजी मिश्रण असलेल्या गोळ्या ७० रुपयांमध्ये उपलब्ध असतील.
इतर कंपन्यांच्या औषधांच्या तुलनेत ही औषधी ६० ते ७० टक्क्यांनी स्वस्त आहेत. मोठ्या कंपन्यांची औषध १० गोळ्या १६२ रुपयांपासून २५८ रुपयांदरम्यान बाजारात विक्री केली जात आहे. सीटाग्लिप्टीन हे औषध पीएबीआयचे सीईओ रवि दाधिच यांनी लॉन्च केले आहे. है औषध टाईप-२ मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये शर्करा नियंत्रित करून जेवण आणि व्यायामासोबत बरेच गुणकारी असल्याचा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.