
सरकार लठ्ठपणा (Obesity) रोखण्यासाठी समोसा, मिठाई, तळलेले पदार्थांवर नियंत्रण आणण्याचा विचार करत आहे.
खाद्यपदार्थांवर फॅट, साखर, मीठाचे प्रमाण दर्शवणारे लेबल लावणे सक्तीचे होऊ शकते.
लठ्ठपणा आणि त्यासंबंधी आजारांपासून वाचण्यासाठी आरोग्यविषयक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
दिवसेंदिवस अनेक लोकांना लठ्ठपणाचा त्रास जाणवत आहे. लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. याचे कारण म्हणजे अयोग्य खानपान आणि जंकफुड खाण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत सरकारने मोठे पाउल उचलण्याची तयारी केली आहे. आता सिगारेच, समोसा आणि जिलेबीवर इशारा देणारी सूचना छापली जाणार आहे. तसेच तरूणामध्ये वाढणारा लठ्ठपणा लक्षात घेता केद्रीय आरोग्य मंत्रालयाने जंक फुजवर इशारा देणारी सूचना लावण्याची तयारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्रालयाने एम्ससह अनेक केद्रीय संस्थांना पोस्टर्स लावण्याचे आदेश दिले आहेत. यात दररोज करण्यात येणाऱ्या नाश्त्यात किती फॅट आणि साखर आहे याची माहिती असेल. असे पहिल्यांदाच दंक फूड आणि तंबाखूसारख्या पदार्थांवर इशारा देणारी सूचना जारी करण्याची तयारी करण्यात आली आहे.