आजीचा बटवा: आयुर्वेदात श्रेष्ठ असलेल्या हरडाचे औषधी गुणधर्म कोणते आहेत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harada

आजीचा बटवा: आयुर्वेदात श्रेष्ठ असलेल्या हरडाचे औषधी गुणधर्म कोणते आहेत?

Grandmother's Batwa: आयुर्वेदात जेवढी म्हणून औषधे सांगितली आहे. तेवढ्या सगळ्या औषधात हिरडा श्रेष्ठ म्हटला आहे. स्वर्गात देवांसाठी साठविलेले अमृत पृथ्वीवर पडले आणि त्याचे हिरडे झाले. खरेच हिरडा अमृत आहे. ह्याच्या नित्य सेवनाने वृध्दत्वपणा जाणवत नाही.

हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रामध्ये अष्टमीला का असते इतके महत्त्व?

चांगला उत्तम वजनदार हिरडा आणून त्याची वस्त्रगाळ भुकटी करुन 1 ग्रॅम भिजेल एवढे तूप घालून रोज घेतल्याने आरोग्य चांगले राहते. कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. बुध्दी, स्मृती तरतरीत होते. ऋतूपरत्वे थोडेसे अनुपान बदलून िहरड्याची बारीक केलेली पूड ग्रीष्म ऋतूत - पावसाळ्यात सैंधवाबरोबर, शरदऋतूत - आश्विन, कार्तिकात- साखरेबरोबर, हेमंत ऋतूत - मार्गशीर्ष - पौषात सुंठीबरोबर व शिशीर ऋतूत माघ, फाल्गुन महिन्यात पिंपळीबरोबर व वसंत ऋतूत चैत्र, वैशाख महिन्यात मधाबरोबर घेतल्यास फार फायदेशीर होते.

हेही वाचा: आजीचा बटवा: बडीशेपचा जोडीदार असलेल्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

● हिरड्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतोतज्ञ्जांच्या सल्लानूसार तुम्ही काही आजारपणांवर हिरडाचा वापर करता येतो.

● सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठीनियमित हिरडा कोमट पाण्यातून घ्या आणि वजन कमी करा. 

● हिरड्याच्या पाण्याने गुळण्या करू शकता. 

● कोमट पाण्याने केलेल्या या गुळण्यांमुळे तुमच्या घशाला नक्कीच आराम मिळेल.

● जर तुम्हाला सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही तो दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता.

● पाण्यात हिरड्याचे फळ उकळून ते पाणी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल आणि मुळव्याधीचा त्रास कमी होईल.   

हेही वाचा: आजीचा बटवा: काळे मिरे अनेक आजारावर आहेत रामबाण उपाय


● नेत्र विकारा दूर करण्यासाठी आणि दृष्टीदोष कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता.

● जर तुम्हाला युरीनरी विकार असतील तर तुमच्यासाठी हिरडा एक उपयुक्त औषधी आहे

● जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या होत असेल तर त्यासाठी हिरड्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता

● जखमा बऱ्या करण्यासाठी अथवा सूज कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता. 

● हिरड्याचा वापर अॅसिडिटीवर केला जातो. कारण हिरड्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

● हिरड्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी अथवा पायदुखीपासून सुटका मिळू शकते.

टॅग्स :lifestylehealth