Green tea: ग्रीन टी का प्यावा? कधी प्यावा आणि ग्रीन टी प्यायचे फायदे काय आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Green tea

Green tea: ग्रीन टी का प्यावा? कधी प्यावा आणि ग्रीन टी प्यायचे फायदे काय आहे

मी आणि माझा नवरा काल किराणा सामान घ्यायला सुपर मार्केट मध्ये गेलो, तेव्हा तो मला बोलला की, आपल्याला आठवणीने ग्रीन टी घे बर का..

कारण विचारलं तर त्याला चहा ऐवजी ग्रीन टी घेणे सुरू करायच आहे असे त्यांने सांगितले. थोडक्यात काय तर आता खूप लोकांच्या डोक्यात ग्रीन टी घेण्याचे फॅड आले आहे.त्यामुळे असंख्य लोक हेल्दी राहण्यासाठी ग्रीन टी घेत आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का? की, ग्रीन टी ही योग वेळी आणि योग्य पध्दतीने घेतली नाही तर ग्रीन टी पिण्याचा काहीच फायदा होत नाही.

म्हणूनच आज आपण या लेखात ग्रीन टी का प्यावा? कधी प्यावा आणि ग्रीन टी प्यायचे फायदे काय आहे या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ग्रीन टी का प्यावा?

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ सांभाळून आणि योग्य पध्दतीनं ग्रीन टी प्याल्यास त्याचे अनेक फायदे होतात. ग्रीन टीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे चयापचयाच्या क्रियेची गती वाढते. ग्रीन टी प्याल्यानं शरीरातील फॅटस कमी होतात. याचा फायदा वजन कमी होण्यासाठी होतो. एका अभ्यासानुसार ग्रीन टीमध्ये पाॅलिफिनाॅल्स असतात. हे पाॅलिफिनाॅल्स ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास रोखतात.

ग्रीन टी कधी प्यावा?

तज्ञांच्या मते ग्रीन टी सकाळी नाश्ता करण्याच्या एक तास आधी प्यायला हवा. एका अभ्यासानुसार ग्रीन टी मध्ये टॅनिन असतं. त्यामुळे खाण्याआधी 1 ते दीड तास आधी ग्रीन टी प्यायला तर बध्दकोष्ठता, पोटदुखी, पचनासंबंधीचे विकार ठीक होतात. ग्रीन टी हा सकाळी आणि संध्याकाळी प्याल्यास आपली चयापचय क्रिया गतिमान होते. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर असतं.

आता बघू या ग्रीन टी किती प्यावा?

दिवसभरात 3 ते 4 कपापेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. ग्रीन टीमध्ये कॅफीन हा घटक असतो. त्यामुळे 3 ते 4 कपापेक्षा जास्त ग्रीन प्याल्यास उलट्या, जुलाब होण्याची शक्यता असते. ग्रीन टीची चव कडवट असल्यानं अनेकजण त्यात साखर घालून पितात. पण अशा पध्दतीनं ग्रीन टी प्याल्यास ग्रीन टीचे फायदेशरीरास मिळत नाही.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

तज्ञांच्या मते सकाळी व्यायाम झाल्यानंतर अर्ध्या तासानं ग्रीन टी प्यावा. सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान ग्रीन टी पिणं योग्य. दुपारी जेवणाआधी 1 तास अगोदर ग्रीन टी प्याल्यास त्याचा फायदा होतो. तर संध्याकाळी काही खाल्ल्यानंतर 1 ते 2 तासांनी ग्रीन टी प्यावा. पण रात्री झोपण्याआधी ग्रीन टी पिऊ नये यामुळे अनिद्रेची समस्या निर्माण होते.