Hair Fall : केस गळतीवर प्रभावी ठरत आहेत या आधुनिक उपचार पद्धती

बहुतेक पुरुष आणि स्त्रियांसाठी केस गळणे हे चिंता आणि अगदी नैराश्याचे कारण ठरत आहे.
Hair Fall
Hair Fallgoogle

मुंबई : केसगळतीच्या समस्येवर उपचारांसाठी काही उत्कृष्ट आणि अतिशय प्रभावी आधुनिक उपचार पध्दती उपलब्ध झाली आहे. या उपचारप्रणालीमुळे एखाद्या व्यक्तिला आता कोणत्याही वेदनांशिवाय किंवा विग आणि टोपीचा वापर न करता वावरणे शक्य आहे. ही उपचारप्रणाली नैसर्गिक आणि अतिशय प्रभावी ठरत आहे.

तुमचे केस किती आहेत हे सामान्यतः लोकांच्या लक्षात येते. टाळूवर टक्कल पडणे, केस पातळ होणे आणि केसांची घनता कमी होणे हे केस गळण्याच्या लक्षणांपैकी एक आहे. बहुतेक पुरुष आणि स्त्रियांसाठी केस गळणे हे चिंता आणि अगदी नैराश्याचे कारण ठरत आहे.

आधुनिक काळातील नाविन्यपूर्ण प्रक्रियेमुळे रुग्णाचे वय, लिंग काहीही असले तरीही केसगळतीवर मात करणे शक्य झाले आहे. पारंपरिक उपचारांमध्ये औषधे, केस प्रत्यारोपण इत्यादींचा समावेश होतो परंतु ते दीर्घकालीन प्रभावी ठरत नाहीत. काही प्रभावी उपचार पद्धतींबद्दल सांगत आहेत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचातज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर.

Hair Fall
अचानक केस गळण्याची कारणे

पीआरपी उपचार : प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी केस गळतीसाठी थ्री स्टेप उपचार आहे. या प्रक्रियेमध्ये रुग्णांचे रक्त काढणे, प्लाझ्मा मिळविण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आणि पुन्हा टाळूमध्ये इंजेक्शन देणे समाविष्ट आहे. हे उपचार प्लाझ्माच्या आरोग्यावर अवलंबून असते. पीआरपी थेरपी हेअर फॅालीकला रक्त पुरवठा वाढवून नैसर्गिक केसांची वाढ सुधारण्याचे कार्य करते.

स्टेम सेल थेरपी : केस गळणे आणि केसांच्या वाढीसाठी हे नवीन पर्याय म्हणजे स्टेम पेशींचा वापर करुन टाळूच्या टक्कल झालेल्या भागात इंजेक्शन दिले जाते. स्टेम पेशींमध्ये नैसर्गिक वाढीचे घटक असतात आणि त्यामुळे केसांची वाढ सुधारते.

लेसर हेअर ट्रीटमेंट : लेझरचा वापर सुप्त केसांच्या कूपांना चालना देण्यासाठी आणि त्यांना नवीन जीवन देण्यासाठी केला जातो. हे उपचार आठवड्यातून किमान दोनदा करणे आवश्यक आहे.

Hair Fall
पावसाच्या पाण्यामुळे केस गळत असल्यास हे उपाय करा

क्युआर६७८ - केस गळतीच्या प्रत्येक प्रकारासाठी ही थेरपी प्रभावी ठरते. तसेच केसांची पुन्हा वाढ होण्यास प्रभावी ठरते. वर नमूद केलेल्या केसांच्या उपचार पद्धती प्रभावी असल्या तरी त्या दीर्घकालीन फायदेशीर ठरत नाहीत आणि त्यामुळे टाळूवर खाज सुटणे, संक्रमण आणि केसांची खराब गुणवत्ता इत्यादीसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

क्युआर६७८ हेअर रिजुव्हनेशन थेरपी ही आजची एकमेव उपचार आहे जी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय दीर्घकालीन सिद्ध परिणाम देते. क्युआर६७८ ही अशा प्रकारची पहिली आणि पेटंट मिळालेली मान्यताप्राप्त हेअर रीग्रोथ थेरपी आहे.

अलीकडील अभ्यासात क्युआर६७८ केसांची वाढ आणि केस गळणे या बाबतीत पीआरपी पेक्षा 300% अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

क्युआर६७८ हेअर ट्रीटमेंटमध्ये केसांच्या वाढीचे घटक असतात जे पूर्णपणे वनस्पतीपासून तयार केलेले असतात आणि प्रत्येकासाठी सुरक्षितपणे वापरले जाऊ शकतात.

क्युआर६७८ केस गळती उपचाराने पॅटर्न टक्कल पडणे, कोविडनंतर केस गळणे, केमोथेरपीमुळे केस गळणे, एलोपेशिया एरेट, पीसीओडी आणि पीसीओएस संबंधित केस गळणे आणि टाळूचा कोरडेपणा आणि डोक्यातील कोंडा अशा रूग्णांमध्ये यशस्वी परिणाम दिले आहेत.

क्युआर६७८ तुमच्या नैसर्गिक केसांना निरोगी, चमकदार करु शकतो. क्युआर६७८ ही वेदनारहित, नॉन-सर्जिकल आणि नॉन-इनवेसिव्ह केसांच्या पुनरुत्पादनाची प्रक्रिया आहे ज्याने जगभरातील १ लाखाहून अधिक लोकांना मदत केली आहे.

क्युआर६७८ प्रक्रियेला केवळ ५ मिनिटे लागतात आणि केस गळतीचे उपचार सुरू केल्यानंतर केवळ १६ आठवड्यांत फायदे दिसू शकतात. तुम्हाला तुमच्या केसांची पोत सुधारुन केसांच्या घनता यामध्ये उल्लेखनीय बदल दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com