

Gentle care makes every baby smile
Sakal
- डॉ. मालविका तांबे
गर्भधारणा झाली की संपूर्ण कुटुंबीय बाळ होण्याची अगदी उत्साहाने वाट बघत असतात. बाळ झाल्यावरती सगळ्यांना आनंद होतो. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण असतं. सगळे जण त्याला सांभाळायला, त्याला मांडीवर घेऊन बसायला अगदी उत्सुक असतात. पण तेच बाळ रडायला लागलं की काय करावं हे कोणालाच सुचत नाही आणि त्यातून एकच पर्याय सगळ्यांना दिसतो तो म्हणजे, 'बाळ रडतंय -आईकडे दे म्हणजे ती त्याला दूध पाजेलं तर ते शांत होईल' आईला स्तन्य उत्पत्ती व्यवस्थित होत आहे ना ? बाळाचे पोट नीट भरतंय ना, किती किती तासांनी बाळाला खरंच दूध पाजण्याची आवश्यकता आहे. या सगळ्याचं गणित मांडणं किंवा ते कोडं सोडवणं इतकं सोप्प नसतं. त्यामुळे नवीनच मातृत्वाचा अनुभव घेणारी स्त्री या सगळ्यातून भांबावून जाते आणि बाळ का रडतंय? याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करते.