
Active Couch Potato : सध्याच्या फास्ट जगामध्ये सर्वांनाच काळाबरोबर वेगात धावपळ करावी लागते. यात स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा कोणाला वेळ नसतो. पण तरीही येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे लोकांमध्ये काहीप्रमाणात जागरूकता दिसून येते. मग आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून व्यायाम केला जातो.
पण एका अभ्यासातून हे सिध्द झाले की, थोडासा व्यायाम शरीरासाठी पुरेसा नाही. या लोकांना ते active couch potato म्हणतात. नक्की काय आहे ही, संकल्पना? कसे ओळखाल? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर जाणून घ्या
तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आधी या दोन प्रश्नांची उत्तरं द्या.
तुम्ही दिवसाला ३० मिनीटं व्यायाम करतात?
तुम्ही दिवसभर कंप्युटरसमोर बसतात आणि रात्री टीव्ही समोर बसतात का?
जर वरच्या दोन्ही प्रश्नांसाठी तुमचं उत्तर होकारार्थी असेल तर संशोधकांच्या active couch potato या व्याख्येत तुम्ही बसतात. याचा अर्थ असा की तुमच्या नियमित व्यायामानंतरही तुम्ही आजाराला बळी पडू शकतात असं अभ्यास सांगतो.
यासाठी फिनलँडमधल्या ३ हजार ७०० हून जास्त स्त्री-पुरूषांवर अभ्यास करण्यात आला होता. हे लोक अर्धा तास बरेच कठीण व्यायाम करत होते. पण त्यानंतर सतत १० ते १२ तास बसून काम करत होते. या लोकांमध्ये उच्च ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल आणि बॉडी फॅट आढळून आले.
याउलट जे लोक सतत उठून थोडसं फिरत असतील किंवा जे हेवी वर्क आउट करतात ते active couch potatoes पेक्षा जास्त निरोगी असतात.
निरीक्षण काय?
या अभ्यासाच्या निरीक्षणातून असे समोर आले आहे की, दिवसभरात फक्त ३० मिनीटांचा व्यायाम पुरेसा नसतो.
अर्धा तास व्यायाम केल्यावर सबंध दिवस बसून काढणे हे अजिबात व्यायाम न केल्यासारखेच आहे.
थोड्याशा सोप्या हालचाली आपल्याला active couch potatoes होण्यापासून वाचवू शकतात.
उपाय काय?
वेगात चालणे हा मध्यम प्रकारचा व्यायाम आहे.
आपल्याला हलके आणि बरेचदा हालचाल करणे आवश्यक आहे.
याशिवाय साफसफाई करणे
पायऱ्या चढणे
हॉलमध्ये फेरफटका मारणे
एकाच जागी स्थिर न बसणे.
या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.