

Food as the Foundation of Life
Sakal
डॉ. मालविका तांबे
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्वास्थ्य जपणे ही कसरतच झालेली आहे. काहीही खायच्या किंवा करायच्या आधी मनामध्ये दहा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यातून सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या प्रकारची माहिती ऐकायला, पाहायला मिळते. बीटरूट आणि डाळिंब हे दोन्हीही रक्तवाढीकरिता मदत करतात. तरीही त्यापैकी श्रेष्ठ कुठलं? असा प्रश्न विचारल्यास आपल्याला समाजामध्ये दोन्ही प्रकारची मतं दिसतील. परंतु आरोग्य टिकवण्यासंबंधीच्या बहुतांश प्रश्नांची आयुर्वेदात उत्तर आहेत. आचार्य चरकांनी सूत्रस्थानाच्या पंचविसाव्या अध्यायामध्ये स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम गोष्टी कुठल्या याबद्दल खूप खोलवर माहिती दिलेली आहे. या यज पुरुषीय अध्यायामधून आपण आज काही थोडी माहिती करूया.