Health Care Tips : ‘जेव्हा कडक भूक लागते, तेव्हाच खा’ ; वाचा आहार कसा असावा

आजारातून बरे होण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो
Health Care Tips
Health Care Tips esakal

आजारातून बरे होण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनासारखा गंभीर आजार होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चौरस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे घरी असताना आहार कसा असावा याबाबत आजच्या लेखातून जाणून घेऊ या.

Health Care Tips
Diabetes Health Care: झोप न झाल्यास वाढतं ब्लड शुगर; डायबिटीज रूग्णांनी एवढे तास घ्यावी झोप

शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे. आहाराचे प्रमाण, प्रकार, वेळा इत्यादींवर आरोग्य अवलंबून असते.पण, आहाराच्या बाबतीत लोक खूप आळशी झालेत. त्यांना तयार पदार्थ खाणे, तिखट मसालेदार पदार्थ जेवणात कमी प्रमाणात असावेत. हॉटेलमध्ये खाणे शक्यतो टाळावे. पचायला साधा हलका ताजा आहार, भूक असेल तेव्हाच जेवणे, थोडी भूक शिल्लक ठेऊन खाणे हे साधे नियम आहेत. कोल्हापूरातील न्युट्रिशनिस्ट डॉ.मृदूल कुंभोजकर यांचे याबाबत काय मत आहे ते जाणून घेऊयात.

Health Care Tips
Health Care: 'या' सात सवयी बनवतील तुम्हाला डायबिटीज पेशंट

न्युट्रिशनिस्टच्या मते, माणसांला अधिक भूक ही फक्त दोनदाच लागते. एक म्हणजे सकाळी आणि दुसरे म्हणजे रात्री. त्यामुळे तूम्हाला जेव्हा जास्त भूक लागली असे वाटते तेव्हाच जेवण करा. जेवणात चायनिज, पिझ्झा बर्गर असे काही न खाता चपाती, पालेभाज्या, डाळी यांचा समावेश करा.

Health Care Tips
Animal Health Care: जनावरे गुदमरून का मरतात ?

जेवणाची इच्छा नसेल तर, फळे खावीत. त्यांचे ज्युस टाळावा. फळे चावून खाल्ल्याने त्यातील जीवनसत्व अधिक प्रमाणात आपल्याला शरीराला मिळते. तळेलेले पदार्थ कमी खावेत. कधीतरी पापड भजी चालू शकेल पण, नियमित जेवताना पापडाचे सेवन करू नयेत.

Health Care Tips
Hair Care Tips : जाहीरातीत पाहिलेले लोण्यासारखे केस खरच होतील?; हे कॉफी मास्क करतील मदत!

मेंदूसाठी उपवास महत्त्वाचा

आठवड्यातून एकदा तरी उपवास करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. मग प्रश्न आहे की, उपवासादिवशी आपले कार्य सुरळीत कसे चालू राहते. त्याचे उत्तर असे की, शरीरातील साठवलेले बॉडी फॅट्स हे मेंदूला आणि शरीराला उर्जा देतात. उपवास आणि इतर दिवशी पाणी जास्त प्यावे. उपवासादिवशी दिवसातून 3-4 लिटर पाणी प्यायला हवे.

Health Care Tips
Hair Care Tips : हे घरगुती उपाय वाढवतील केसांची चमक

वजन कशाने वाढते

जेवणात सकस आहार घेणे म्हणजे, पचायला त्रास होणार नाही असे अन्न खाणे. त्यामुळे जेवणात सर्व प्रकारची धान्ये व डाळी खाणे जरुरीचे आहे. तसेच, तूप आपल्या शरीरासाठी आवश्यक पदार्थ आहे. पण, वजन वाढते या भितीने लोक तूप खाणे टाळतात. पण, तूपाने वजन वाढत नाही. तर, तूम्ही रोज खात असलेल्या चपातीमुळे वजन वाढते.

Health Care Tips
Bike Care Tips: बाईकमधून काळा धूर का येतो? जाणून घ्या

नॉनव्हेज खाणे योग्य?

नॉनव्हेज पदार्थाबद्दल कोणताही गैरसमज नसावा. नॉनव्हेज हे शरीराला अत्यंत चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स देतात. तर मासे ही मेंदूसाठी चांगले आहेत. दूध आणि पनीर हे शाकाहारी लोकांनी बिन्दास्त खावावे. शाकाहारी लोकांसाठी हा चांगला प्रोटीन सोर्स आहे. तर, सोयाबीननेही चांगले फॅट्स मिळतात.

Health Care Tips
Skin Care Tips: फक्त 5 मिनिटांत दिसाल फ्रेश; ट्राय करा या टिप्स

शरीरासाठी काय घातक ?

डबेबंध पदार्थ, शीतपेय, प्रक्रिया केलेले पदार्थ हे आहारातून वजा करा. वनस्पती तूप, मार्गरीन, ह्याचा वापर टाळा. हे सर्व पदार्थ शरीराला घातक ठरवू शकतं. शेंगदाणे, बदाम, अक्रोड मेंदूला उत्तम. फळे अख्खी खा. त्याचा ज्यूस नको. बटाटा, वांगी, गवार ह्या भांज्यांचं सेवन थोडं कमी प्रमाणात खावे. अधिक प्रथीने आणि स्नीग्ध पदार्थ खा. पण कार्बस कमी खावावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com