Skipping Rope
Skipping Rope Sakal

Skipping Rope Benefits : स्किपिंगमुळे कॅलरी कमी होण्यासोबतच तुमचा स्टॅमिना वाढतो, जाणून घ्या त्याचे फायदे

Health Care News : दोरी उड्या मारण्याचे काय फायदे आहेत? जाणून घ्या
Published on

दोरी उड्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु तरीही बरेच लोक त्यांच्या डेली वर्कआउटमध्ये याचा समावेश करण्यास विसरतात. याचे फक्त एकच नाही तर अनेक फायदे आहेत, ज्याबद्दल सर्वांनाच पूर्ण माहिती नाही.

हा एक वर्कआउट आहे ज्यासाठी फार महाग आणि फॅन्सी मशीनची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त एक साधी, हलकी दोरी आणि थोडी जागा हवी आहे. काही लोक गंमत म्हणून दोरी उड्या मारतात, तुम्ही हे इतर अनेक मार्गांनी करू शकता जसे की क्रिस क्रॉस, साइड स्विंग, अल्टरनेट फूट जंप इ.

चला जाणून घेऊया दोरी उड्या मारण्याचे काय फायदे आहेत

हात मजबूत होतात, शरीर अधिक लवचिक होते, पायांचे स्नायू मजबूत होतात, कार्डिओ हेल्थ चांगले राहते, हाडे मजबूत होतात, शरीर चपळ होते, शरीराचे संतुलन राखते, कॅलरीज बर्न होतात, चरबी कमी होते, एन्डॉर्फिनला चालना मिळते, वर्कआउटच्या आधी शरीराला वॉर्म अप करते, स्नायूंना टोन करते, उंची वाढवते, चेहऱ्याची सूज कमी करते.

Skipping Rope
Health Care News : पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतो का? मग रिकाम्या पोटी 1 चमचा खा ही पावडर

कोणतेही वर्कआउट करण्यापूर्वी, तुम्ही 3-5 मिनिटे दोरी उड्या मारून तुमच्या स्नायूंना वॉर्म करू शकता. शक्य तितक्या उंच उडी मारण्याचा प्रयत्न करा. हा एक चांगला कार्डिओ आहे जो हृदयाला निरोगी ठेवतो. ज्या दिवशी तुम्हाला रनिंग करण्याचे मन नाही किंवा काही कारणास्तव घराबाहेर पडता येत नाही, तेव्हा दोरी उड्या मारणे हा वर्कआउट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

दोरी उड्या मारल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमितपणे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटे दोरी उड्या मारल्या पाहिजे.

नियमितपणे दहा मिनिटे दोरी उड्या मारल्याने रक्ताभिसरण सुधारते.

नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.

दोरी उड्या मारल्याने फुफ्फुसांना बळकटी मिळते आणि त्यांची क्षमता वाढवते.

नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयविकाराचा झटका आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

दोरी उड्या मारल्याने मुलांची उंची वाढण्यास मदत होते.

Shabda kode:
Marathi News Esakal
www.esakal.com