Health Care News: वेट लॉस आणि फॅट लॉस यात काय फरक आहे? जाणून घ्या

वजन कमी करणे आणि चरबी कमी करणे या दोघांमधील फरक समजून घेतल्याने तुम्हाला तुमच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यात मदत होऊ शकते.
fat loss
fat losssakal

आजच्या काळात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. खराब आहार आणि जीवनशैलीमुळे लोक लठ्ठ होत आहेत. ऑफिसमध्ये किंवा घरात सतत एकाच जागी बसून राहिल्यानेही शरीरात चरबी जमा होऊ लागते.

बहुतेक लोक याबद्दल खूप जागरूक होत आहेत आणि त्यांना तंदुरुस्त राहायचे आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात.

परंतु शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी, हेल्दी वेट मेंटेन करणे देखील आवश्यक आहे आणि हेल्दी वेट मेंटेन ठेवण्यासाठी आपण वजन कमी करावे की चरबी कमी करावी हे देखील जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

सामान्यतः केवळ वजन कमी करणे चांगले नाही कारण या प्रक्रियेत संपूर्ण शरीराच्या वजनातून स्नायू, पाणी, ग्लायकोजेन आणि चरबी नष्ट होते. तर, चरबी कमी झाल्यास, शरीरात आधीच साठवलेली चरबी कमी होते. त्यामुळे हा एक चांगला पर्याय मानला जातो.

fat loss
Thyroid Control Food: थायरॉइडवर नियंत्रण ठेवण्यास हे पदार्थ करतील मदत, आजच करा आहारात समावेश

वेट लॉस करणे म्हणजे काय?

वेट लॉस करणे म्हणजे शरीराचे वजन कमी करणे, म्हणजेच वजन कमी करण्यासाठी शरीरातून स्नायू, चरबी आणि पाण्याचे वजन कमी करावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही क्रॅश डाएट आणि ग्लूटेन फ्री डाएटने शरीराचे वजन कमी करू शकता.

पण असे केल्याने वजनासोबतच शरीराला आवश्यक असलेले स्नायूही कमी होतात, जे शरीराला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच, जर तुम्हाला स्लिम आणि टोन्ड बॉडी हवी असेल तर यासाठी तुम्ही वजन कमी करू नका तर चरबी कमी करा.

फॅट लॉस करणे म्हणजे काय?

फॅट हा शरीराचा एक आवश्यक भाग आहे जो शरीराच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पण जेव्हा त्याचे प्रमाण शरीरात वाढू लागते, तेव्हा त्याची चरबी शरीरात वाढू लागते. शरीरात साठलेली ही फॅट बर्न करण्याच्या प्रक्रियेला फॅट लॉस म्हणतात.

शरीरातील चरबी कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कॅलरीची कमतरता आणि हार्ड वर्कआउट्स. जर तुम्हाला टोन्ड बॉडी मिळवायची असेल तर त्यासाठी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी केली पाहिजे.

अशा परिस्थितीत तुम्ही क्रॅश डाएट आणि ग्लूटेन फ्री डाएटद्वारे शरीराचे वजन कमी करू शकता, परंतु असे केल्याने वजनासोबतच शरीराला आवश्यक असलेले स्नायूही कमी होतात, जे शरीराला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

याचा अर्थ वेट लॉस करताना तुम्हाला तुमचे संपूर्ण शरीराचे वजन कमी करावे लागेल. आपण चरबी कमी करत आहात की शरीरातून एकूण वजन कमी होत आहे हे जाणून घेणे कठीण होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com