
Health Diet for kids: लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांचा आहारात या '5' गोष्टीचा समावेश करा
Health Diet for kids: मुलांना सकस आहार देणे हे आईसाठी मोठे आव्हान असते. कारण लहान मुलांचा आहार फक्त आरोग्यदायी असुन चालत नाही तर तो चविष्ट देखील असावा लागतो ही गोष्ट सदैव लक्षात ठेवूनच लहान मुलांचा आहार तयार करावा लागतो.
समजा लहान मुलांना एखादा पदार्थ आवडत नसेल तर ते त्या पदार्थाकडे बघ सुद्धा नाही. अशा परिस्थितीत, पालकांना मोठी शक्कल लढवून लहान मुलांचा आहार हा सकस आणि चवदार बनवावा लागतो.पण आजकाल अनेक पालक असे आहेत ज्यांना सकस आहार (Food) कोणता दयावा?
याबद्दल खूप गोष्टी अजुनही माहिती नाही आहे. त्यामुळे ते त्यांना कोणतेही अन्न पदार्थ खायला देतात आणि मग असे अन्न पदार्थ खाल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्यांचे दुष्पपरिणाम होऊ लागतात. तुमच्या मुलांच्या आरोग्य असे दुष्परिणाम होऊ नये यासाठी आम्ही आज हा खास लेख घेऊन आलो आहोत.या लेखात तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा, यात कोणते पदार्थाचा समावेश करावा या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पालेभाज्या खाण्याची सवय लावावी.
लहानपणापासून मुलांना पालेभाज्या खाण्याची सवय लावावी.जसे की पालक, बीन्स,ब्रोकली, गाजर या गोष्टीची बारीक पेस्ट किंवा ज्यूस करून लहान मुलांना दयावा. कारण या भाज्या मध्ये फायबर आणि पोषक तत्वांनी समावेश असतो. त्यामुळे तुमच्या लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते.
मुलांना पोळी भात खाण्याची सवय लावावी.
गहू तांदूळ आदी धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे या धान्यामधून अनेक आवश्यक पोषक घटक लहान मुलांच्या शरीरात जातात. मुलांच्या आहारात गहू आणि तपकिरी तांदूळ यांचा समावेश करा. जेणेकरून हा आहार आरोग्यदायी आहार बनू शकेल.
लहान मुलांना रोज एक मोसमी फळ खायला द्यावे.
फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. मुलांच्या आहारात दररोज किमान एका फळाचा समावेश करा. फळांमध्ये, त्यांना केळी, टरबूज आणि सफरचंद खायला द्या. त्यामुळे मुलांचा आहार निरोगी राहील.
कडधान्य आणि शेंगा याचाही मुलांच्या आहारात समावेश असावा.
कडधान्ये आणि शेंगा या दोन्ही गोष्टी लोह, पोटॅशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात या गोष्टीचा आठवणीने समावेश करावा. जसे की चणे, राजमा, वाटाणे, मटकी ही कडधान्ये मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
सुका मेवा देखील लहान मुलांसाठी फायदेशीर ठरु शकतो.बाळ एका वर्षाच झाल की त्याला तुम्ही हेल्दी बनवण्यासाठी वरील गोष्टी खाऊ घालु शकता.या गोष्टी तुम्ही सुक्या मेव्यांचाही समावेश करू शकता. सुका मेवा चांगला बारीक करुन मुलांच्या आहारात (Food) समाविष्ट करता येऊ शकतो.खास करून खजूर आणि अंजीर मुलांना सर्वात जास्त फायदेशीर ठरतात.