आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

हे सर्व विश्‍व व जीवन चालवणारी अशी एक सुसूत्र व्यवस्थित संकल्पना आणि शक्ती अस्तित्वात आहे हे प्रत्येकास जाणवतेच, तसेच काही गोष्टी किंवा प्रसंग हे अनाकलनीय राहतात.
yoga health

yoga health

sakal

Updated on

हे सर्व विश्‍व व जीवन चालवणारी अशी एक सुसूत्र व्यवस्थित संकल्पना आणि शक्ती अस्तित्वात आहे हे प्रत्येकास जाणवतेच, तसेच काही गोष्टी किंवा प्रसंग हे अनाकलनीय राहतात. या सर्व संकल्पना ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्याला ‘देव’ असे म्हटले जाते व या देवाशी म्हणजेच सर्व विश्‍वाशी संबंध जोडणारा तो धर्म समजला जातो.

तेव्हा देव आणि धर्म यांच्यापासून सुटे होणे किंवा स्वातंत्र्य मिळविणे ही केवळ काल्पनिक मनोधारणा होऊ शकते. इंद्रियांना जेवढे समजते, तेवढेच सत्य, हा झाला भौतिकवाद; परंतु त्याच्याही पलीकडे असलेल्या अनाकलनीय अस्तित्त्वाचा परिणाम होताना नक्कीच दिसतो, हा झाला अध्यात्मवाद, म्हणून आत्मविश्‍वास आणि श्रद्धा याच्यापासून स्वतंत्र होता येत नाही. म्हणजेच मनाला स्व-तंत्राप्रमाणे वागून चालत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com