Health Insurance Plan : कुटुंबासाठी कसा निवडाल बेस्ट इन्शुरन्स प्लान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Insurance Plan

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकं विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त (Health Problem) आहे. आरोग्याच्या या समस्येमुळे जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात तरुणांच्या आरोग्यावर या धावपळीच्या युगात मोठा परिणाम झाला आहे. आरोग्याच्या समस्येमुळे अचानक केव्हा काय संकट निर्माण होईल सांगता येत नाही. त्यात सध्याचा वैद्यकीय खर्च लक्षात घेता मोठ्या आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. अशात एक योग्य आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) असणे गरजेचे आहे. 

Health Insurance Plan : कुटुंबासाठी कसा निवडाल बेस्ट इन्शुरन्स प्लान

जीवनात निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्येमुळे आर्थिक दिवाळखोरी होण्याची शक्यता असते. अनेकांवर हा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे हा प्रसंग टाळण्यासाठी योग्य आरोग्य विमा योजना खरेदी करावी.

विमा योजना खरेदी करण्यापूर्वी तुमच्या गरजा ओळखा आणि आरोग्य विमा योजना देखील नीट समजून घेतली पाहिजे. सर्वात आधी आरोग्य विमा योजना खरेदी करताना विमा फक्त तुमच्यासाठी खरेदी करत आहात की संपूर्ण कुटुंबासाठी हे ठरवा. असे केल्याने तुम्हाला योग्य आरोग्य विमा पॉलिसी निवडणे सोपे होईल.

वय, कौटुंबिक वैद्यकीय इतिहास, आधीच अस्तित्वात असलेले रोग आणि त्याच्या उपचाराचा खर्च या बाबींचा देखील विचार विमा खरेदीपूर्वी केला पाहिजे. 
बाजारात अनेक प्रकारच्या हेल्थ पॉलिसी उपलब्ध आहे. या सर्वांची माहिती घेत पॉलिसीचे फायदे, हप्ता, पॉलिसीशी संबंधित कर्ज आणि कर सूट याविषयी माहिती घ्या.

वय, कौटुंबिक वैद्यकीय इतिहास, आधीच अस्तित्वात असलेले रोग आणि त्याच्या उपचाराचा खर्च या बाबींचा देखील विचार विमा खरेदीपूर्वी केला पाहिजे. बाजारात अनेक प्रकारच्या हेल्थ पॉलिसी उपलब्ध आहे. या सर्वांची माहिती घेत पॉलिसीचे फायदे, हप्ता, पॉलिसीशी संबंधित कर्ज आणि कर सूट याविषयी माहिती घ्या.

हेल्थ पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी वयाला खूप महत्त्व दिले जाते. वयानुसार पॉलिसीचा हप्ता ठरतो. त्यामुळे व्यक्तीने व्यावसायिक करिअर सुरू होताच हेल्थ पॉलिसी घेतली पाहिजे. जेणेकरून भविष्यातील संकटाला सहज तोंड देता येऊ शकते. शक्य असल्यास 30 वर्षे वयाच्या आसपास योग्य आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करावी.

योग्य आरोग्य पॉलिसी निवड करणे हे महत्त्वाचे आहे. तुमचं आरोग्य चांगलं असेल, तर तुम्ही अशी आरोग्य विमा पॉलिसीची निवड करा जी अधिक कव्हरेज देते. म्हणजेच यात गरज भासेल तेव्हा रुम कॅटेगरीचं बंधन नसावं. कोणत्याही आजाराता या पॉलिसीचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच उपचाराच्या खर्चाची मर्यादा नसावी.

ओपीडीमध्ये दाखवण्याची सोय असावी. यासह  वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधाही असावी.ही बाब लक्षात ठेवा
हेल्थ पॉलिसी ही तुमच्या आरोग्यविषयक संकटात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विश्वासार्ह विमा कंपनीकडूनच पॉलिसी खरेदी करावी.

ओपीडीमध्ये दाखवण्याची सोय असावी. यासह वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधाही असावी.ही बाब लक्षात ठेवा हेल्थ पॉलिसी ही तुमच्या आरोग्यविषयक संकटात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विश्वासार्ह विमा कंपनीकडूनच पॉलिसी खरेदी करावी.

तुम्हाला जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये उपचाराची सुविधा मिळेल अशीच पॉलिसी खरेदी करा. तसेच पॉलिसी ही ओपीडी कव्हरेज सहज असावी आणि उपचारांवर अतिरिक्त खर्च करण्याची गरज भासत कामा नये. तसेच विमा लाभ मिळावा म्हणून कोणत्याही प्रकारचा क्लेम करण्याची गरज नसावी. या सर्व बाबी लक्षात घेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार हेल्थ पॉलिसी घ्यावी.

टॅग्स :Insurancelifestylehealth