Health : किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी सुपर वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health kidney stone

Health : किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी सुपर वरदान

नागपूर : किडनीस्टोन झालेल्या गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नाहीत. यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनचे तुकडे तुकडे करणारे ‘लिथोट्रिप्सी’ गरीब रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. विदर्भातील सहा शासकीय महाविद्यालयांपैकी केवळ ‘सुपर’मध्येच हे यंत्र आहे. विना शस्त्रक्रिया होणाऱ्या या यंत्रावर वर्षभरात सातशेवर रुग्णांवर उपचार होतात. नुकतेच हे यंत्र दीड महिन्यांपूर्वी सुपरमध्ये लावण्यात आले. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: Health: काकडी खाण्याचे फायदे!

विदर्भातील वातावरण उष्ण आहे. कष्टकऱ्यांना घाम गाळावा लागतो. घाम जास्त जातो. कमी पाणी कमी पिणाऱ्यांना ‘किडनी स्टोन’ होण्याचा धोका अधिक आहे. विशेषतः उन्हाळ्यात अशा रुग्णांची संख्या वाढते. किडनीतील खडा हजारपेक्षा कमी घनतेचा, दीड सेंटीमीटरपेक्षा कमी रुंदीचा असेल तर ‘एक्स्ट्रॉ कॉर्पोरिअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ यंत्रामुळे शस्त्रक्रिया टाळणे शक्य आहे. यंत्राच्या साहाय्याने लेझरद्वारे किडनीतील खडे सुक्ष्म दाण्यांसारखे फोडले जातात. लघुशंकेच्या वाटेने बाहेर टाकले जातात. पहिल्यांदा २००४ मध्ये ‘डॉर्निअर डेल्टा १’ हे यंत्र सुपरमध्ये युरॉलॉजी विभागात लावले होते. १ कोटी ५५ लाखाचे हे यंत्र पंधरा वर्षे सुरू होत. मागील पंधरा वर्षात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार झाले.

हेही वाचा: Health: डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरमध्ये काय आहे फरक?

युरॉलॉजी विभाग गरिबांसाठी वरदान

मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपरमधील गरीब रुग्ण येतात. गरिबांच्या प्रत्येक आजारासाठी सुपर हाच पर्याय आहे. सुपरच्या युरॉलॉजी विभागात गरिबांना उपचारासोबतच सौजन्याने वागणूक मिळते. यामुळेच या विभागात दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत आहे. सहयोगी प्राध्यापक डॉ. धनंजय सेलुकर यांच्यावरच या विभागाचा भार आहे. गरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.

हेही वाचा: Health: अंजीर खाण्याचे अनेक फायदे, मात्र अंजीर खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे काय?

मेडिकल असो की सुपर. गरिबांना योग्य उपचार मिळावेत आणि उत्तम डॉक्टर तयार व्हावेत हाच या उद्देश आहे. लिथोट्रिप्सी यंत्र किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी वरदान आहे. विदर्भात एकाच शासकीय रुग्णालयात हे यंत्र आहे.

-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल-सुपर.