ओमिक्रॉनची दहशत कायम; जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातील धाेका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health news doctor who Omicron in mumbai Report of Genome Sequencing mumbai

ओमिक्रॉनची दहशत कायम; जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातील धाेका

मुंबई : कोरोनावर मात करण्यात यश आले असताना कोरोनाचा उपप्रकार असलेल्‍या ओमिक्रॉन विषाणूचा धोका कायम असल्‍याचे जिनोम सिक्वेन्सिंगच्‍या अहवालातून दिसून आले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगचा १४ वा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून २३० नमुन्यांची तपासणी केली असता सर्व नमुने ओमिक्रॉनचे आढळले आहेत. दरम्यान, ४३ वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर मृत्यू झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्‍यामुळे मुंबईत ओमिक्रॉनची दहशत कायम असल्‍याचे बोलले जात आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाचे नवीन व्हेरिएंट समोर आले आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचाच उपप्रकार असून कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असले, तरी ओमिक्रॉनचे टेन्शन कायम आहे. २३० बाधितांपैकी ७४ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. पैकी १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील तिघांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली; तर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू ओढवला. ज्या रुग्णाचा मृत्यू ओढवला, त्याचे वय ४३ वर्षे होते. तसेच तो मधुमेह व हृदयविकाराने त्रस्त होता. लक्षणे गंभीर होऊ लागल्यानंतर तीन दिवसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अहवाल काय सांगतो?

२३० नमुन्यांपैकी २८ टक्के अर्थात ६४ नमुने हे बीए २.७४ व्हेरिएन्टचे आहेत.

२० टक्के अर्थात ४५ नमुने हे बीए २.७५ व्हेरिएन्टचे आहेत.

आणखी २० टक्के म्हणजेच ४५ नमुने हे बीए २.७६ व्हेरिएन्टचे आहेत.

तर १२ टक्के अर्थात २८ नमुने हे बीए २.३८ व्हेरिएन्टचे आहेत.

८ टक्के म्हणजेच १९ नमुने हे बीए ५ व्हेरिएन्टचे आहेत.

तर ७ टक्के अर्थात १८ नमुने हे इतर व्हेरिएन्टचे आहेत.

४ टक्के म्हणजेच ९ नमुने हे बीए २.३८.१ व्हेरिएन्टचे आहेत.

तर १ टक्के अर्थात २ नमुने हे बीए ४ व्हेरिएन्टचे आहेत.

मास्‍क वापरणे झाले बंद

काेरोना आव्याकात आलेला असला तरीही ओमिक्रॉनची दहशत कायम असल्‍याने नागरिकांनी काळजी घेणे गरजे असल्‍याचे मत जाणकारांनी व्यक्‍त केले आहे. सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गर्दी होत असून नागरिकांनी मास्‍क वापरणे जवळपास बंद केल्‍याचे दिसून येत आहे. विशेष करून लोकलमध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी होत असून नागरिकांनी मास्‍क न वापरणे पुन्हा एकदा कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे होऊ शकते. त्‍यामुळे नागरिकांनी जबाबदारीने गर्दीच्या ठिकाणी मास्‍क वापरणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकिय क्षेत्रातील जाणकार व्यक्‍त करीत आहेत.

Web Title: Health News Doctor Who Omicron In Mumbai Report Of Genome Sequencing Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..