Health: ऑफिसमध्ये वारंवार शिफ्ट बदलावी लागते? पण याचा होतोय तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

आजकाल कामाचा ताण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ऑफिसमध्ये तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेतलं जातं. मॉर्निंग, सेकेंड आणि नाईट शिफ्ट. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या तीनही शिफ्टला सामोर जावं लागतं.
health news Side Effects of Rotating Office Shift
health news Side Effects of Rotating Office Shift
Updated on

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणसाला अनेक समस्यांना सामोरं लागत आहे. आजकाल कामाचा ताण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ऑफिसमध्ये तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेतलं जातं. मॉर्निंग, सेकेंड आणि नाईट शिफ्ट. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या तीनही शिफ्टला सामोर जावं लागतं.

पोटाची खळगी भरण्यासाठी अशा गोष्टींचा सामना हा प्रत्येकाला करावाच लागतो. तुम्ही देखील या परिस्थितीतून जात असाल. पण तुम्हाला माहितीय का वारंवार शिफ्ट बदलल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया शिफ्ट बदलण्याचे साईड इफेक्ट्स.

पुरेशा झोप मिळत नाही

रात्री लवकरच झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. योग्य वेळी झोपले आणि योग्य वेळी उठले की आपली ७ ते ८ तासांची झोप अगदी सहज पूर्ण होते. पण बदलत्या शिफ्टमुळं निद्रानाशाची समस्या निर्माण होते. त्यामुळे दिवसभर थकवा, चिडचिडेपणा आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

health news Side Effects of Rotating Office Shift
Women Health : स्त्रियांनो, 'PCOD' चा त्रास कसा कराल कमी? या योगासनांची घ्या मदत

तसेच, हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. संशोधनांनुसार, शिफ्ट कर्मचाऱ्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक यांसारखा धोका जास्त असतो. हे विशेषतः तणाव, अनियमित खाण्याच्या सवयी आणि झोपेची कमतरता यांमुळे होते.

तसेच, मनावरही गंभीर परिणाम होतो. मानसिक संतुलन बिघडल्याने नैराश्याचा धोकाही वाढतो. याशिवाय वैयक्तिक जीवनावरही परिणाम होतो.

health news Side Effects of Rotating Office Shift
Health Care News: पावसाळ्यात जांभूळ खाल्ल्यानं कमी होतेय रक्तदाबाची समस्या; वाचा अन्य फायदे!

पचन विकार

बदलत्या शिफ्टमुळं आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळा देखील बदलतात. यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होतो. पचनसंस्था बिघडते. ॲसिडिटी, पोटात गॅस, अपचन आणि इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

health news Side Effects of Rotating Office Shift
Health Care News : वजन कमी करण्यासाठी रोज प्या जिऱ्याचे पाणी; पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल!

वजन वाढण्याची समस्या

सततच्या बदलत्या शिफ्टमुळं खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि शारीरिक हालचाली कमी होतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. बहुतांश शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठी जीवनशैली पाहायला मिळते. लठ्ठपणा, टाईप-2 मधुमेह, काही प्रकारचे कॅन्सर, हृदयविकार होण्याचा मोठा धोका आहे. बैठ्या जीवनशैलीचा मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. बैठी जीवनशैली असलेल्या लोकांना कालांतराने नैराश्याचा धोका वाढू शकतो. तसेच कमी शारीरिक हालचालींमुळे आनंद वाढवणाऱ्या हार्मोन्सचा स्रावही कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.