Sugarcane Juice Health Risks: उसाचा रस पिताना 'या' चुका टाळा, अन्यथा उन्हाळ्यात होऊ शकतो आरोग्याचा धोका
Sugarcane Juice Risks: उन्हाळ्यात गोड ऊसाचा रस शरीराला थंडावा देतो, मात्र तो पिताना स्वच्छता आणि योग्य प्रमाण यांची काळजी घेतली नाही, तर आरोग्यावर धोका वाढू शकतो. तर पाहूया, उसाचा रस पिताना कोणत्या चुका टाळायला हव्यात.
Summer Health Tips: उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की थंड पेयांची इच्छा सर्वांनाच होते आणि त्यात 'उसाचा रस' हे अनेकांचं आवडतं पेय ठरतं. गोडसर चव, ताजेपणा आणि थंडावा यामुळे अनेकांच्या ओठांवर हमखास 'उसाचा रस' हे नाव येतं.