Health tips : खरचं 'हे' पदार्थ खाल्याने मासिक पाळीचा त्रास कमी होतो का?

पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक आणि शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात.
Menstruation
MenstruationEsakal

Menstruation: मासिक पाळीचे ते चार ते पाच दिवस महिलांसाठी फार त्रासदायक असतात. यावेळी त्यांना मानसिक आणि अनेक शारीरीक त्रास होत असतो. आज महिला घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका सांभाळते. मग अशावेळी हा त्रास तिला अनेक वेळा अडथळा होतो. काही महिलांना पाळी येण्यापूर्वीच त्रास व्हायला सुरुवात होते. स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे अशाप्रकारचे त्रास होतात.साधारण कोणाकोणाला हा त्रास 1-2 आठवडे होतात. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक आणि शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात. 

आजच्या लेखात आपण मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान त्रास होत असल्यास नियमितपणे काही विशिष्ट पदार्थ खाल्ले तर तुम्हाला मासिक पाळीत होणारा त्रास हा कमी होऊ शकतो.

1) पाळीमधील समस्यांवर उपाय म्हणून नागलीच्या पिठाचे डोसे किंवा भाकरी खाणं फायदेशीर ठरतं.

2) नागली नसेल तर मग घरात उपलब्ध असणारी मुगाची डाळ भिजवून त्याचे डोसे खाल्ले तरी चालतील.

3) मासिक पाळीच्या चार दिवसात आहारात राजगिरा, शिंगाडा, तांदळाची खिचडी, साबुदाण्याची खिचडी खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.

Menstruation
Winter Recipe:हिवाळ्यात शरिराला पौष्टिक असणारे नाचणीचे खरपूस धपाटे कसे तयार करायचे?

4) मासिक पाळीत  तुमच्या पोटात, कंबरेत, पायात वेदना होत असतील तर दुपारच्या जेवणात दही भात खावा. सोबत मुगाचा किंवा नागलीचा पापड भाजून खावा. यामुळे तुमचा मूड चांगला होतो आणि वेदनाही कमी होऊ शकतात.

5) पाळीच्या चार दिवसात जाणवणार्‍या वेदनांवर उपाय म्हणून या चार दिवसात थोडे गुळ शेंगदाणे खावे. कारण मासिक पाळीच्या काळात मूड बदलणे, सतत खावंसं वाटणं यासारखे त्रास यामुळे नियंत्रणात राहातात. गुळ शेंगदाणे खाल्याने रक्तस्राव देखील मोकळा होतो.

6) मासिक पाळीत अधिकाअधिक तूप खावे त्यामुळे पोटात होणाऱ्या वेदना कमी होतात. मळमळ होणं, उलटी होणं हे त्रासही दूर होतात.

Menstruation
Winter Tips : हिवाळ्यात दुधात तुळशीचे पाने उकळून पिण्याचे काय आहे फायदे?

7) मासिक पाळीच्या काळात रात्री भिजवलेले काळे मनुखे आणि त्यात केशर टाकून खाल्ल्याने मासिक पाळीतील त्रास ,पोटात, कंबरेत चमका येणाऱ्या चमका कमी होतात.

8) मासिक पाळी दरम्यान पुदिन्याचा चहा घेतल्यानेदेखील बराच आराम मिळतो. पोटदुखी, मळमळ आणि गॅस इत्यादी समस्या पुदिन्याचा चहा प्यायल्याने दूर होतात. 

9) मासिक पाळीच्या काळात महिलांनी प्रथिनेयुक्त आहारही घ्यावा. दही, दूध, मांसाहार, अंडी, मासे, अंकुरलेले धान्य इत्यादींचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

10) मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातून ब्लड लॉस (Bleeding) होतो. जास्त रक्तस्त्राव होणाऱ्या महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. पालक, केळी, भोपळा, बीट इत्यादी लोहयुक्त पदार्थ खाल्ल्याने या समस्यापासून सुटका मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com