Green Peas: हिरवे मटर आरोग्यासाठी अगदी बेटर! चमकदार त्वचा अन् बरंच काही..वाचा फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Green Peas

Green Peas: हिरवे मटर आरोग्यासाठी अगदी बेटर! चमकदार त्वचा अन् बरंच काही..वाचा फायदे

Health Tips: मटर म्हणजेच वाटाणा आपण वेगवेगळ्या पदार्थांमार्फत खात असतो. मटरची भाजी, मटर पराठा, मटर पुलाव अशा अनेक पदार्थांच्या माध्यमातून आपण वाटाणा आहारात घेतो. मात्र केवळ वापरायचा चमचमीत पदार्थांना चव येते म्हणून अनेकजण वाटाण्याचा वापर करतात. मात्र मटर खाण्याचे नेमके फायदे तुम्हाला माहिती आहे काय? ते माहिती झाल्यास तुम्ही अवाक व्हाल.

मटरमध्ये विटॅमिन सी ची मात्रा असते. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात ज्याचा फायदा आपल्या त्वचेला होतो. हिवाळ्यात बाजारात ताज्या टवटवीत वाटाण्याच्या शेंगा मोठ्याप्रमाणात उपलब्ध असतात. गोडसर वाटाण्याने जेवणाची चव आणखीच चमचमीत होते. वाटाण्यामध्ये विटॅमिन बी-६, विटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असते. त्वचेसाठीही ते उत्तम ठरते.

हेही वाचा: Green chilli thecha recipe: महाराष्ट्रीयन पद्धतीने झनझनीत हिरव्या मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा ?

वाटाण्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तसेच वाटाण्यात असणारे प्रोटीन, विटॅमिन आणि फायबर रक्तातील साखर वाढू देत नाही. हाडांसाठी वाटाणा हा उत्तम असतो. वाटाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजनही वाढत नाही व त्याचा फायदा शरीराला होतो. तसेच वाटाणा कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील नियंत्रित ठेवतो.

टॅग्स :skin carehealth