
थंडीत मटार खाताय! पण, सावधान!
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात तसेच ताजे हिरवे मटार बाजारात येतात. अनेक घरात तर किलो- २ किलो किंवा त्यापेक्षा जास्त मटार आणून ते सोलून डीप फ्रिजमध्ये ठेवले जातात. मग मटारची भाजी, लोणचं, करंजी असे विविध प्रकार केले जातात. हिवाळ्यात अशाप्रकारे भरपूर मटार खाल्ले जातात. मटार खाणे आरोग्यासाठी चांगले समजले जात असले तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. त्यामुळे मटार जास्त खाऊ नयेत.
हेही वाचा: थंडीत हेल्दी राहायचंय? हे सात पदार्थ खा
या आहेत समस्या
मटार जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन 'के' ची पातळी जास्त वाढते. व्हिटॅमिन 'के' शरीरात जास्त झाले तर, शरीरातील रक्त पातळ होऊन प्लेटलेटची संख्या कमी होते. या काळात तुम्हाला जखम झाली, तर ती भरायला जास्त काळ लागतो. तसेच एखाद्याला पोटाशी संबंधित समस्या असतील तर मटार खाल्ल्याने त्या वाढू शकतात.
मटारमध्ये प्रथिने, अमीनो ऍसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामध्ये हाडांसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन डी असते. परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियमची पातळी कमी होते आणि यूरिक ऍसिड वाढू लागते.
हेही वाचा: थंडीत संत्री खाणे फायद्याचे, शरीराला होतात 'हे' 5 फायदे
मटार जास्त खाल्ल्याने पोटात दुखणे, पोटाला सूज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गॅसेस होऊ शकतात. मटारमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे पचनास अडचणी येतात. मटारमध्ये लेक्टिन असते. त्यामुळे पोटातली जळजळ वाढून पोट बिघडू शकते.
मटार खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते. मटारमध्ये मुबलक प्रमाणाक प्रोटीन, फायबर असते. पण जास्त मटार खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मटार जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. मटारमध्ये असलेले फायटिक ऍसिड आणि लेक्टिन पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणतात.
हेही वाचा: थंडीत पालक खाल्ल्याने होतील हे ५ फायदे, राहाल हेल्दी
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)