Health Tips : वजन कमी करायचंय ? ‘हे’ आयुर्वेदीक चुर्ण आजच सुरू करा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : वजन कमी करायचंय ? ‘हे’ आयुर्वेदीक चुर्ण आजच सुरू करा !

Herbal churn use for weight loss : लठ्ठपणा सध्याच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. बाहेरील पदार्थ खाणे वजन वाढीच्या समस्येचे आजारात रूपांतर करते. सध्या पौष्टिक आहार सोडून चटपटीत आहार खाण्याकडे लोकांचा कल असतो आणि त्याचेच परिणाम वाढत्या वजनाने भोगावे लागतात. सध्या दहा पैकी प्रत्येकी पाच माणसे तरी वजन वाढीच्या समस्येने त्रस्त असतात आणि या समस्येतुन लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी ते विविध घरगुती उपाय सुद्धा वापरत असतात.

हेही वाचा: Weight loss : पाण्यात या गोष्टी मिसळल्यास वजन होईल कमी

योग्य माहीती न मिळाल्याने याचा अधिक फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला जे आयुर्वेदिक चुर्ण सांगणार आहोत ते एकदा नक्की करून बघा. या उपायांनी वजन कमी झाल्यावर सगळेच तूम्हाला टीप्स नक्की मागतील

हेही वाचा: Weight Loss करा अन् मिळवा एक्स्ट्रा सॅलरी ; कंपनीच्या SEO चं कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्ण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तीन फळांचे मिश्रण करून ही पावडर बनवली जाते.वजन कमी करण्यासाठी १ चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. हे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्यावे

हेही वाचा: Weight Loss :वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील खाता का सॅलेड? मग...

कलोंजी पावडर

कलोंजीमध्ये असलेले पोषक घटक वजन कमी करू शकतात. या पावडरचे सेवन करण्यासाठी 100 ग्रॅम कलोंजीच्या बीया घ्या. कलोंजी बारीक गॅसवर भाजून त्याची पावडर करून घ्या. त्यानंतर रोज कोमट पाण्यासोबत १ चमचा सेवन करा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

हेही वाचा: Weight Loss: ‘या’ खास गोष्टी घ्या आहारात, झटक्यात वजन कमी होणार

ओवा पावडर

पचनाशी संबंधित कोणताही आजार असेल तर, ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. ओवा पावडर वजन कमी करण्यास मदत करू शकते. पोट थंड ठेवण्यासाठी ओवा प्रभावी आहे. याचे सेवन करण्यासाठी ओवा भाजून त्याची पावडर बनवा. त्यानंतर थंड पाण्यात टाकून खावा. यामुळे वजन कमी होऊ शकते.

टॅग्स :aayurvedaayurvedahealth