
Water Intake : जाणून घ्या, गटागटा पाणी पिण्यापेक्षा वजनानुसार किती पाणी प्यावे?
Know How Much Drink Water As Per Age : आरोग्यासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. पाण्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ज्यावेळी शरीरातील पाणी कमी होते त्यावेळी आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?
साधारणपणे दररोज प्रत्येक व्यक्तीने किमान 2 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. मात्र, तुम्हाला माहित आहे का की, वजनानुसार किती पाणी पिणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती सांगणार आहोत. वजनानुसार पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र
सर्वात प्रथम तुमचे वजन किती आहे हे तपासा. वजन मोजल्यानंतर ते 30 ने विभाजित करा. विभाजित केल्यानंतर जो नंबर तो तुमच्या रोज पाणी पिण्याचा हिशोब आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे वजन 60 किलो असेल. 60 ला 30 ने भागल्यास 2 नंबर येतो. याचा अर्थ निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज 2 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

Drinking water tips
वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास वजन कमी करण्यासह मदत होते. पाण्यात कॅलरीज नसतात. त्यामुळे जितके जास्त पाणी प्याल तितके वजन कमी होईल आणि शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल
कामाच्या स्वरूपावर अवलंबून आहे पाण्याचे प्रमाण
जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते तेव्हा त्यात शरीराची ऊर्जा वापरली जाते. या ऊर्जेच्या वापरामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शाररिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींनी अधिक पाणी पिणे केव्हाही फायद्याचे ठरते.
दुसरीकडे, जर एखादी व्यक्ती केवळ बसून असेल, तर, त्याच्या शरिराला काम करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत कमी पाण्याची गरज भासेल. त्यामुळे तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे यावरदेखील पाण्याची मात्र किती असावी हे अवलंबून असते. जर तुम्ही जास्त काम करत असाल तर, रोज 10 ते 15 ग्लास पाणी प्या, जर तुम्ही जास्त काम करत नसाल तर, तुम्ही रोज साधारण 6 ग्लास पाण्याचे सेवन करू शकता.
व्यायाम आणि जेवणाच्या अर्धा तास आधी करा पाण्याचे सेवन
दिवसभरातील वजनानुसार पुरेसे पाणी पिण्याचे लक्षात ठेवा, जर तुम्ही व्यायाम करत असाल तर साधारण दर अर्ध्या तासाने किमान एक ग्लास पाणी प्यावे. व्यायामामुळे घाम येतो यामुळे शरिरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्याचवेळी जर तुम्ही वजन कमी करत असाल तर, जेवणापूर्वी साधारण अर्धा लिटर पाणी प्या. यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल.