Typhoid : टायफॉईड संसर्गजन्य आहे का? एकामुळे तो दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो का? जाणून घ्या सत्य

Typhoid Symptoms: टायफाॅईडकडे साधा ताप आला म्हणून दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात. काहीवेळीस टायफाॅईडचा ताप हा जीवघेणा देखील ठरू शकतो. यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये ताप आणि अंगदुखी अशी लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणं गरजेचं आहे
Typhoid Symptoms
Typhoid SymptomsEsakal

Typhoid Symptoms : पावसाळ्याच्या ऋतूमध्ये Monsoon विविध आजारांचा आणि खास करून संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो. यासाठीच आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं ठरत. पावसाळ्यामध्ये टायफाॅईड तापाची लागण होण्याची मोठी समस्या कायम पाहायला मिळते. Health Tips Marathi Know about Symptoms of Typhoid

२-३ दिवसांपेक्षा जास्त ताप राहिल्यास तो टायफाॅईडचा Typhoid ताप Fever तर नाही ना अशी चिंता अनेकांना सतावते. तसंच डॉक्टरही अशावेळी मलेरिया आणि टायफाॅईडची चाचणी करायला सांगतात. टायफॉइड हा आजार साल्मोनेला एन्टरिका सेरोटाइप टायफी बॅक्टेरियामुळे Bacteria होतो.

हे बॅक्टेरिया दूषित पाणी Contaminated Water आणि अन्नावाटे शरीरामध्ये प्रवेश करतात. टायफाॅईडमध्ये ताप आणि अंगदूखी खास करून पायांमध्ये तीव्र वेदना निर्माण होतात.

हा ताप साधारण १ते २ आठवडे राहतो. तसचं टायफाइटमधून पूर्णपणे बरं होण्यासाठी ३-४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

टायफाॅईडकडे साधा ताप आला म्हणून दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात. काहीवेळीस टायफाॅईडचा ताप हा जीवघेणा देखील ठरू शकतो. यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये ताप आणि अंगदुखी अशी लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणं गरजेचं आहे.

टायफाॅईडच्या तापाबद्दल अनेकांच्या मनात विविध प्रश्न आणि शंका असतात. खास करून हा ताप एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला होवू शकतो का? म्हणजेच टायफाॅईड हा आजार संसर्गजन्य आहे का? असा प्रश्न तर अनेकांना पडतो. यासाठीच टायफाॅईडबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. typhoid causes

हे देखील वाचा-

Typhoid Symptoms
Dengue Fever : ताप अंगावर काढू नका; रक्ताची तपासणी करून उपचार घ्या

टायफाॅईड लोकांमध्ये कसा पसरतो

टायफाॅईड दूषित पाणी किंवा अन्नामुळे होत असून तो संसर्गजन्य आजार नाही असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात तो योग्य आहे. टायफाॅईड हा थेट संसर्गजन्य आजार नसला तरी एका व्यक्तीमुळे तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकतो.

टायफॉइडची लागण झालेले लोक साल्मोनेला टायफी किंवा साल्मोनेला पॅराटाइफी बॅक्टेरिया पसरवू शकतात. टायफाॅईडची लागण झालेल्या व्यक्तीच्या लघवी किंवा विष्ठेतून हे बॅक्टेरिया बाहेर पडतात. त्यामुळे हे बॅक्टेरिया सांडपाण्यामध्ये मिसळतात.

हे सांडपाणी जर पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलं जात असेल तर असं दूषित पाणी प्यायल्याने इतर व्यक्तींना देखील या बॅक्टेरियाचा संसर्ग होवून टायफाॅईड होवू शकतो.

टायफाॅईडची सामान्य लक्षणं

टायफाॅईडचे बॅक्टेरिया शरीरामध्ये प्रवेश करताच भरपूर ताप येतो. तसचं डायरिया, उलटी आणि अंगदुखी ही लक्षणं दिसू लागतात. टायफॉइड हा एक प्रकारचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्ग आहे जो दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे तुमच्या आतड्यांमध्ये प्रवेश करतो. इंफेक्शनमुळे शरीराचं तापमान वाढतं. हा संसर्ग बरा होण्यास २-३ आठवडे जातात.

टायफाॅईड जीवघेणा ठरू शकतो का?

टायफाॅईडची लागण झाल्यास भरपूर ताप येत असल्याने वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच औषोधोपचार सुरु न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. टायफाॅईडचा संसर्ग वाढल्यास तापासोबतच इतर त्रासही वाढू लागतात. यात भूक न लागणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि वेदना, थकवा, अशक्तपणा अशी लक्षणं दिसू लागतात.

यासाठीच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी किंवा अन्नाचं सेवन करू नका. गरज असल्यास पाणी उकळून प्या. जेणेकरून टायफाॅईड सारख्या आजारापासून दूर राहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com