Dengue Fever : ताप अंगावर काढू नका; रक्ताची तपासणी करून उपचार घ्या

डेंगीने काढले डोके वर!
Dengue fever
Dengue feversakal

छत्रपती संभाजीनगर : सध्या जिल्ह्यात डेंगीने डोके वर काढले असून महिनाभरात तब्बल २७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ताप भरल्यास तो अंगावर काढू नका. कारण पहिल्या टप्प्यात या आजाराची वा तापाची लक्षणे साधी वाटतात. हा साधासुधा ताप असेल, असे मानून अनेकदा रुग्ण घरीच औषधे घेतात.

परंतु, या निष्काळजीपणाचा परिणाम रुग्णाच्या श्वसनसंस्थेवर होतो. या तापात चौथ्या दिवसानंतर रक्तस्रावाचे प्रमाण वाढते. त्यामुळे ताप आला की तो अंगावर काढू नका. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तत्काळ रक्ताची तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

सध्या पावसाळा सुरु असून जागोजाग पाणी तुंबणे आणि घाणेरड्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांची संख्या वाढ होत आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया आणि चिकनगुन्यासारखे आजार पसरतात. जुलै महिन्यात ९८ रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून यात २७ रुग्ण हे डेंगीसदृश आढळले आहेत. तर जिल्ह्यामध्ये जानेवारी ते जुलै महिन्यात ८४ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत.

Dengue fever
Mental Health Tips: कामात मन लागत नाही? सतत थकल्यासारखे वाटते? आजच सोडा या 4 वाईट सवयी

अशी घ्या काळजी

हा एक व्हायरल ताप आहे म्हणून त्यादरम्यान पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन आणि एस्प्रिनसारख्या औषधांचे सेवन करू नका. कारण डेंगीवर अॅंटीबायोटिक गोळ्यांचा काहीही परिणाम होत नाही. जितके देता येईल तितके रुग्णाला ओआरएस पावडरचे पाणी देत राहावे. भूक लागो अथवा न लागो पण जेवणाच्या वेळी रुग्णाला साल असलेल्या मूग डाळीची खिचडी द्या.

हे करा

  • कोरडा दिवस पाळणे

  • दर आठवड्याला पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ कोरडी करावीत.

  • पाणी साठवण्याची भांडे, हौद, पाण्याच्या टाकी नेहमी झाकून ठेवावेत

  • लहान मुलांना मच्छरदाणीत झोपवावे.

Dengue fever
Chhatrapati Sambhaji Nagar : चक्क शिक्षकच करायचा मुलींशी अश्लील चाळे; वर्गातील सीसीटीव्हीत झाले कैद, आरोपीला बेड्या
  • दरवाजा खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.

  • दिवसा व रात्री पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे, तसेच बूट व मोज्यांचा वापर करावा.

  • घरातील तसेच परिसरातील गवत, झुडपे काढून टाकावे.

  • डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.

  • पाळीव प्राण्याचे पाणी, पिण्याचे भांडे दररोज रिकामे स्वच्छ करावे.

  • हौदात गप्पी मासे सोडवावेत.

  • रिकाम्या बकेट, प्लॅस्टिकचे टप, नारळाच्या करवंट्या यांची योग्य विल्हेवाट लावावी.

कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर ः जलजन्य आजाराचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी नागरिकांनी प्रत्येक आठवड्यात कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Dengue fever
Chh. Sambhaji Nagar Crime : सासरच्या लोकांनी मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

घरातील कुलर्समध्ये पाणी, फुलदाण्यातील, मनीप्लॅंटमधील पाणी आठवड्यातून एकदा बदलावे. घरातील सांडपाण्यात अबेट (टेमीफॉस) हे डास अळी प्रतिबंधात्मक औषध टाकून घ्यावे. घरात, परिसरात पाणी साचू देवू नये, ते वाहते करावे. डास प्रतिबंधात्मक मलम, उदबत्त्या, वडया यांचा वापर करावा. अंगभर कपडे घालावे व मच्छरदाणीचा वापर करावा.

महानगरपालिकेतर्फे धूर फवारणी, औषध फवारणी, अबेट टाकणाऱ्यांना सहकार्य करावे. शुध्द केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. अन्नपदार्थ शिजवून खावे, शिळे अन्न खाण्याचे टाळावे, अन्नपदार्थ नेहमी झाकलेले असावे. उघडयावरील कापलेली फळे, अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, जास्त पिकलेली, कुजलेली, सडलेली फळे खाण्याचे टाळावे. उघड्यावर शौचास बसू नये, असे आवाहन केले आहे.

डेंगीची लक्षणे

  • ताप

  • डोकेदुखी

  • स्नायू व सांधे दुखणे

  • शरीरात रक्तस्राव

  • उलटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com