Bad Breath Problem: श्वासाची दुर्गंधी ची समस्या चुटकीसरशी होईल दूर...करा हा प्रयोग

लिंबाच्या रसामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लिंबू मदत करत. हेच लिंबू तुमच्या श्वासाच्या दुर्गंधीची समस्या दूर करू शकतं
bad breath problem solution
bad breath problem solution Esakal

Bad Breath Problem Home Remedies: अनेकदा दांतांची आणि तोंडाची योग्य काळजी घेऊनही श्वासातून दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना सतावते. यामुळे बऱ्याचदा लोकांध्ये जात असताना अशी व्यक्ती कचरते. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी मग माऊथ वॉशचा आधार घेतला जातो. Health Tips Marathi Lemon use for Bad Breath Problem

मात्र नैसर्गिक उपाय करून देखील श्वासाच्या दुर्गंधीची Bad Breath समस्या दूर करणं शक्य आहे. यासाठी एक फळ Fruit तुम्हाला मदत करू शकतं. हे फळ म्हणजे लिंबू. पोहे असो किंवा मिसळ लिंबामुळे या पदार्थांची चव वाढण्यास मदत होते. Oral care 

तसंच लिंबाच्या सरबतामुळे Lemon Juice एनर्जी बूस्ट होण्यास मदत होते. लिंबाच्या रसामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लिंबू मदत करत. हेच लिंबू तुमच्या श्वासाच्या दुर्गंधीची समस्या दूर करू शकतं. Lemon juice for bad breath 

श्वासाच्या दुर्गंधीसाठी लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी उपलब्ध असतं. तसचं त्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट देखील असतात. लिंबू तुमच्या हिरड्यांमधली संयोजी ऊतकांना म्हणजेच कनेक्टिव टिशूजना मजबूत ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे दात जागेवर राहतात. 

लिंबाच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते. तसचं पेरियोडेंटल समस्या रोखण्यास मदत होते. यासोबतच श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. अर्थातच ओरल म्हणजेच तोंडाची काळजी घेण्यासाठी नियमित दातं घासणं गरजेचं आहे. Bad breath problem 

हे देखिल वाचा-

bad breath problem solution
Breathing चा हा गंभीर आजार तुम्हाला ठाऊक आहे का?, झोपेत होवू शकतो मृत्यू

असा करा लिंबाच्या रसाचा उपयोग

लिंबाचा माऊशवॉश म्हणून वापर करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एका लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर या पाण्याने गुळण्या करा आणि चूळ भरा.

दिवसातून तुम्ही २-३ वेळा या माउथवॉशचा उपयोग करू शकता. लिंबाचा अति वापरही दातांचं नुकसान करू शकतं. यातील सायट्रिक अॅसिडमुळे दातांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे याचा अति वापर करू नये. 

लिंबू, पूदीना आणि काकडीचं माऊथवॉश

हे माऊथवॉश तयार करण्यासाठी तुम्हाला लिंबू, पूदीना, काकडी आणि कोमट पाण्याची आवश्यकता आहे. एक ग्लास कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा.

लिंबाचा रस जास्त प्रमाणात मिसळू नये. यात काकडीच्या काही स्लाईस टाका आणि पुदीन्याची काही पान देखील टाका. ५ मिनिटांसाठी हे मिश्रण झाकून ठेवा. त्यानंतर या पाण्याने गुळण्या करा. Lemon for bad breath 

दिवसातून १-२ वेळा तुम्ही या माऊथवॉशचा उपयोग करु शकता यामुळे श्वासातील दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. पूदीन्यामुळे फ्रेशनेस जाणवेल. तसचं ओरल हेल्द चांगली राहण्यास मदत होईल. 

श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबासोबतच तुम्ही इतर काही नैसर्गिक पर्याय निवडल्यास तुमची समस्या दूर होईल. 

  1. ग्रीन टी- ग्रीन टीचा वापर करुन तुम्ही तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका करून घेऊ शकता. ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात यामुळे श्वासातील दुर्गंधी दूर होवून हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. यासाठी कोमट ग्रीन टीने तुम्ही गुळण्या करू शकता. Green tea benefits 

  2. लवंग- जेवल्यानंतर लवंग चघळल्याने श्वासातील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तसचं दातांच्या आरोग्यासाठी लवंग गुणकारी आहे. अनेकदां दातांमध्ये इंफेक्शन झाल्याने तोंडातून दुर्गंधी येते. लंवगमुळे दातांमधील इंफेक्शन कमी होण्यास मदत होते आणि तोंड्याची दुर्गंधी दूर होते. 

  3. डाळींबाचं साल- श्वासातील दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी डाळिंबाची साल पाण्यात टाकून हे पाणी चांगलं उकळून घ्यावं. त्यानंतर पाणी कोमट झाल्यानंतर हे पाणी गाळून गुळण्या कराव्यात. यामुळे श्वासातील दुर्गंधी हळूहळू कमी होईल. 

  4. जीरं- जेवल्यानंतर भाजलेलं जिरं खाल्ल्याने देखील श्वासातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. 

अशा प्रकारे तुम्ही घरगुती आणि नैसर्गिक पर्यायांची निवड करून श्वासातील दुर्गंधी दूर करु शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com