
General Knowledge : ठेल्यावरील चाट अन् लिंबू पाण्याच्या गाडीला लाल कपडा का असतो?
General Knowledge : उन्हाळ्याला सुरुवात झाली की चौक, गल्ली बोळीत तुम्हाला लिंबू पाणी बनवणारा, चाट मसाला यांसारखे दुकानं दिसतील. उन्हाळ्यात चाट खाण्याचे शौकीन दुकानात जाऊन त्याचा आस्वाद घेतात. मात्र चाट-लिंबू पाणी विकणारे दुकानदार आपल्या गाड्यांवर लाल कपडे का लावतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? यामागे काय कारण असू शकते, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
चाट पुरी, लिंबू पाणी किंवा चना-मसाला विकणाऱ्या गाड्यांजवळ गेल्यावर लाल रंगाचे कापड झाकलेले तुम्हाला दिसले असेलच. यासोबतच उन्हाळ्यात लस्सी विकणारे काही दुकानदारही त्यांच्या मोठ्या हौदाला लाल रंगाचे कापड बांधतात. वास्तविक, लाल रंग अतिशय तेजस्वी असतो आणि लोकांच्या नजरा या रंगावर खिळतात. यामुळेच ग्राहकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जावे म्हणून लोक त्यांच्या गाड्यांवर लाल कापड लावतात. हातगाडीवर लाल रंगाचे कापड बांधणारे खाद्यपदार्थांची विक्री करताना तुम्हाला दिसतील. एवढेच नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. जाणून घेऊया.
जर तुम्ही हायस्कूलमध्ये शिकला असाल तर तुम्हाला हे माहिती असायला हवे की दिवे सात रंगांनी बनलेले असतात. त्याची वेवलेंग्थ सर्वाधिक आहे, तर फ्रिक्वेंसी सर्वात कमी आहे. जे लाइट किंवा वेवसारखी काम करते. यामध्ये, वेवलेंग्थ जितकी जास्त आणि फ्रिक्वेंसी जेवढी कमी तितका रंग लख्ख दिसतो. यामुळेच लाल रंगाकडे लोकांचे आकर्षण जास्त असते. आता जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला नजर टाकली तर लाल रंगाची वस्तू तुम्हाला सगळ्यात आधी आकर्षित करेल. (Science)

आणि याच कारणाने चाट पुरी, लिंबू पाणी यांसारख्या गाड्यांवर लाल कापड बांधलेले तुम्हाला दिसून येईल. गल्ली बोळींतून विकायला येणाऱ्या कुल्फीच्या हातगाड्यांवरसुद्धा लाल रंगाचे कापड असतेच असते. (Summer)