Health Tips : झोपेची सायकल बिघडलीये? रात्री 'या' गोष्टी खाणे टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : झोपेची सायकल बिघडलीये? रात्री 'या' गोष्टी खाणे टाळा

आपल्याला कोणत्याही वेळी काहीही खाण्याची सवय असते. पण प्रत्येक वस्तू खाण्याची योग्य वेळ असते. जसे काही गोष्टी दिवसा खाल्ल्याने फायदा होतो तर काही रात्री खाल्याने फायदा होतो. आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत रात्री कोणत्या गोष्टी खाल्ल्याने त्रास होतो.

हेही वाचा: Food: पारंपरिक तुरीचं वरण डाएट करतानाही विसरू नका; तुरीचं वरण खाण्याचे 5 फायदे

कॉफी - काही लोकांना रात्री कॉफी पिण्याची सवय असते. झोपण्या आधी कॉफी पिऊन झोपायला जातात आणि झोप येत नाही. मग रात्रभर झोप येत नाही म्हणून तळमळत राहतात. त्यामुळे त्यांची स्लीप सायकल बिघडते. सकाळी उठल्यावरही त्यांना थकवा जाणवतो. कॉफीत कॅफेन असते जे मेंदूला ॲक्टिव्ह करते. ज्यामुळे झोप उडते. म्हणून रात्री कॉफी पिऊ नये.

हेही वाचा: आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणावर होणार चर्चा.. ‘कॉफी विथ करण’मध्ये येणीर गौरी खान

काकडी - रात्री काकडी खाऊ नये. काकडी पचायला जड असते. त्यामुळे रात्री उशीरा काकडी खालल्याने पचनसंस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो. काकडी दिवसाच खावी. पण जर तुम्हाला संध्याकाळी खायची असेल तर ७ वाजे आधी खावी.

हेही वाचा: Cucumber For Summer: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने होतात ४ फायदे

मिठाई - मिठाई खाणे सर्वांनाच आवडते. पण रात्री गोड खाणे फार अडचणीचे ठरू शकेल. रात्री उशीरा गोड खाल्ल्याने झोपेला बाधा होऊ शकते. गोड खाल्ल्याने मेंदू ॲक्टिव्ह होतो, ज्यामुळे झोप उडते.

हेही वाचा: अनोख्या चॉकलेट राखीची क्रेझ, सणाच्या आनंदाबरोबर तोंडही गोड