लाल रक्तपेशींतील दोषामुळे ‘सिकलसेल’ चा आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health world sickle cell day 2022

लाल रक्तपेशींतील दोषामुळे ‘सिकलसेल’ चा आजार

नागपूर : लाल रक्तपेशींतील दोषामुळे सिकलसेल आजार होतो. जेव्हा लाल रक्तपेशी मधील हिमोग्लोबीनमध्ये ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड येते. तेव्हा गोलाकार लालरक्त पेशींचा आकार बदलून त्या वक्राकार किंवा विळ्यासारख्या दिसायला लागतात. विळ्याला इंग्रजी भाषेत ‘सिकल’ असे म्हणतात. तर पेशींना ‘सेल’ म्हणतात. त्यावरुन या आजाराचे नाव ‘सिकलसेल’ असे पडले.

जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे रुग्ण आढळतात. त्यामुळे संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा अतिशय जागरूक आहे. यात उपचारासोबतच रुग्णांचे समुपदेशन महत्त्वाचे ठरते. जिल्ह्यात डागा स्मृती स्त्री रुग्णालयात समुपदेशनाची व्यवस्था आहे. याच रुग्णालयात मोफत तपासणी, रक्तपुरवठा व औषधोपचारही करण्यात येतात.

सिकलसेल रुग्णाच्या पेशींमधल्या हिमोग्लोबिनमुळे प्रथिनात दोष आढळतो. त्यामुळे त्यास सिकलिंग हिमोग्लोबिन असे म्हणतात. या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते. यामुळे त्या लवकर फुटतात व शरीरातील रक्त कमी होते. यालाच ॲनिमिया किंवा सिकलसेल ॲनिमिया म्हणतात. हा आजार पूर्णतः आनुवंशिक आहे.

सिकलसेल आजाराची लक्षणे

रक्तक्षय, हातापायावर सूज येणे, सांधेदुखी, बारीक ताप, थकवा, वारंवार सर्दी खोकला, कावीळ, असह्य वेदना, पक्षाघात, पित्ताशय, मूत्रपिंडाचे आजार, न भरून येणाऱ्या जखमा, डोळे, शारीरिक व मानसिक त्रास, जंतू संसर्ग.

सिकलसेल आजार पूर्णपणे नष्ट होण्यासाठी कोणतेही औषध अद्याप उपलब्ध नाही. परंतु, हा आनुवंशिक आजार असल्याने दोन वाहक किंवा पीडितांनी लग्न टाळल्यास या आजाराचा प्रसार रोखता येऊ शकते.

-डॉ. श्रीराम गोगुलवार, (प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर)

सिकलसेल हा आनुवंशिक आणि भयानक आजार आहे. साधारपणे तो काही प्रमाणात सर्वच समुदायांत आढळतो. भारताच्या काही भागांमध्ये याचे रुग्ण अधिक सामान्यपणे आढळतात. विदर्भ हे असेच एक ठिकाण आहे.

- डॉ. विंकी रुघवाणी (अध्यक्ष थैलेसिमिया ॲण्ड सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया)

Web Title: Health World Sickle Cell Day 2022 Defect In Red Blood Cells

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top