तर काय ?

अपचन, पित्त असंतुलन आणि स्त्री आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञ आयुर्वेदिक मार्गदर्शन देणारे हे प्रश्नोत्तर सदर आहे. आहार, जीवनशैली आणि नैसर्गिक उपचारांचा समतोल कसा साधावा, याचे सविस्तर उत्तर येथे दिले आहे.
Foods to Avoid for Better Digestion

Foods to Avoid for Better Digestion

Sakal

Updated on

प्रश्न: माझे वय चाळीस वर्षे आहे. तीन-चार वर्षांपूर्वी माझ्या पित्ताशयात खडे सापडल्यामुळे माझे पित्ताशय काढून टाकण्यात आले आहे. तेव्हापासून अपचनाचा फार त्रास होतो. मी खाण्यात काय गोष्टी टाळाव्या? कृपया सुचवावे आणि याच्यावर काही आयुर्वेदिक उपचार करता येतील का?

- तेजा भावे, नागपूर

उत्तर : पित्ताशयासारखा महत्त्वाचा अवयव काढून टाकल्यावर पचनसंस्थेच्या कामावरती दुष्परिणाम होणं स्वाभाविक असतं. आहारामध्ये अतिस्निग्ध व जड पदार्थ टाळावे, तसेच आंबवलेले पदार्थ, मांसाहार, जड कडधान्य, जंक फूड हे सर्व रात्रीच्या वेळेला संपूर्णपणे टाळलेले बरे राहील. घरी केलेलं पनीर किंवा खवा हा क्वचित खायला ठीक आहे. पण बाजारातले पनीर, चीज व खवा संपूर्णपणे टाळलेले बरे. शरीरात पित्ताचे संतुलन राहण्याकरता संतुलन पित्तशांती गोळ्या तसेच सॅन पित्त सिरप घेणे उत्तम ठरेल. रोज रात्री झोपताना एक चमचा संतुलन अविपत्तिकर चूर्ण घेतलेले सुद्धा उत्तम राहील. प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतल्यास आयुर्वेदिक उपचार व पथ्य अजून सटीक दृष्ट्या सांगता येतील. कधीही पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास असताना शस्त्रक्रिया आधी आयुर्वेदिक उपचार व आहाराचे मार्गदर्शन घेऊन पहिले फरक पडतो आहे का हे पाहिलेले उत्तम राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com