

Why Winter Is the Best Season for Digestion
sakal
डॉ. मालविका तांबे
सर्वांत चांगला ऋतू कोणता? असा प्रश्न विचारला, तर बहुतेकांची पसंती नक्कीच हिवाळ्यालाच मिळते. गरमीतील उकाडा आणि घाम, पावसाळ्यातील ओलसरपणा यांपेक्षा हिवाळ्यातील गुलाबी, आल्हाददायक थंडावा मनाला अधिक भावतो. थंडी सुरू झाली की रजई ओढून घरात बसावंसं वाटतं. गरम-गरम वाफाळलेला चहा हातात घेऊन क्षणभर विश्रांती घ्यावीशी वाटते. बाहेर परिवार व मित्रमंडळींसोबत बसायची वेळ आली तर शेकोटीची ऊब सगळ्यांना एकत्र आणते. एकूणच या ऋतूत ऊब आणि उष्णतेचा सहवास सुखकर वाटू लागतो.