Chest Pain : छातीत दुखलं म्हणजे हार्ट अटॅकचाच धोका असतो? हे वाचाच

छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते का?
Chest Pain
Chest Painsakal

छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की आता हृदयविकाराचा झटका येतो की काय म्हणून घबराट निर्माण होते . पण डॉक्टरांचे वारंवार असे सांगणे आहे की छाती दुखणे म्हणजे हृदयविकारच होणे असे समजण्याचे काही कारण नाही .

इतरही कारणाने छाती दुखू शकते. पित्त वाढल्याने सुध्दा छाती दुखते . ही छाती दुखणे म्हणजे वेदना नसतात . तर छातीत जळजळ करायला लागते . पोटातील आम्ल उलट्या दिशेने वर सरकायला लागते आणि ते छातीपर्यंत येऊन छातीत जळजळ व्हायला लागते. अशा वेळी छातीत होणाऱ्या वेदना म्हणजे हृदयविकार नव्हे . त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही . (chest pain causes heart attack)

आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न केला तरीही छातीत वेदना होतात . या वेदना स्नायूला होत असतात . कारण वजन उचलण्याचा ताण स्नायूवर आलेला असतो . हृदयाचेही दुसरे काही विकार असतात. हृदयाचा प्रत्येक विकार म्हणजे नव्हे तेव्हा हृदयविकाराला सोडून हृदयाची इतर दुखणी होतात तेव्हाही छाती दुखू शकते.

न्युमोनिया झाल्यानंतरसुध्दा छातीत वेदना होऊ शकतात . हा विकार सर्दीबरोबरच यकृतात जंतू संसर्ग झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे छातीत वेदना होऊ शकतात .

Chest Pain
Heart Attack : आहारातील हे पदार्थ ठरतील हृदयासाठी घातक

न्युमोनियामध्ये कफ , ताप आणि खोकला एकदम होतो आणि छाती दुखते . जास्त दगदग झाल्यानेसुध्दा छातीत दुखू शकते . त्यामुळे वरील कारणाने होणाऱ्या छातीतल्या वेदना आणि हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी होणाऱ्या वेदना यातला फरक लक्षात घेतला पाहिजे .

हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा होणाऱ्या छातीतल्या वेदना वेगळ्या असतात . अशावेळी छाती वरवर दुखत नाही . तर आतून प्रचंड वेदना होतात . त्या वेदनांचा त्रास घसा , हाताचे दंड आणि एवढेचे नव्हे तर जबड्यांनाही होतो . अशा वेळी काळजी घेणे गरजेचे असते.व लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे.

डॉ. अमित बोरकर - आहारतज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com