
Heart Attack येण्याआधी तुमच्या डोळ्यात दिसतात 'हे' संकेत, वेळीच उपचार घ्या नाहीतर...
Heart Attack Signs : अनेकदा तुम्ही ऐकले असेल की माणसाच्या जिभेपेक्षा त्याचे डोळे जास्त सत्य सांगतात. काही प्रमाणात, हे आपल्या आरोग्याबद्दल देखील म्हटले जाऊ शकते.
अनेकवेळा असे दिसून आले आहे की, तुमची तब्येत चांगली नसते तुम्ही दुर्लक्ष करत असला तरी तुमचे डोळे ते लपवू शकत नाहीत. अनेक संशोधने आणि तज्ज्ञांनीही डोळ्यांमध्ये अनेक खोल रहस्ये दडलेली असल्याचा दावा केला आहे.
तुमचे आरोग्य, जन्म, मृत्यू, आजारपण आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक रहस्ये डोळ्यात लपलेली असतात. तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली असेल की तुम्ही कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर टॉर्च घेऊन डोळ्यांकडे बघतात.
हृदयात काही समस्या असतील तर त्याचा परिणाम डोळ्यांवरही दिसून येतो. माणसाचे हृदय ही त्याची जीवनरेखा असते. हृदयाचे ठोके थांबले की आयुष्य संपलंच समजा. हृदय हे पंपिंग मशीन आहे. हृदय रक्त पंप करते. त्यानंतर संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह होतो.
जेव्हा हृदयाचं आरोग्य अडचणीत येतं तेव्हा संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. आणि त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर दिसून येतो. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या म्हणण्यानुसार, हृदयाशी निगडीत आजारामुळे दरवर्षी सुमारे 1.79 कोटी लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारामुळे होतो.

Heart Attack Signs
ही लक्षणं दर्शवतात हृदयाचं आरोग्य
ब्लड प्रेशर
'युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो'च्या मते, उच्च बीपीमुळे रक्तदाब वाढतो. या स्थितीत रेटिनोपॅथी होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांच्या नसांमध्ये रक्त जाते. त्यानंतर रक्त गोठण्यास सुरुवात होते. डोळ्यांच्या शिरा फुटू शकतात तसेच प्रकाशही जाऊ शकतो.
रेटिनाला कर्व्ह येणे
या आजारात डोळयातील पडदा कोरडे होण्याबरोबरच आकुंचन पावू लागते. त्यामुळे दृष्टी पूर्णपणे नष्ट होते.
मोतीबिंदू
हृदयाशी संबंधित आजारांमुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होऊ शकतो, असे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. मोतीबिंदूच्या ऑपरेशन दरम्यान हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातामुळे मृत्यूचा धोका असतो.
हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक तयार होणे
जेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास सुरुवात होते, तेव्हा डोळ्यांपर्यंत पोहोचणारे रक्त कमी होते. यामुळे डोळयातील पडदा नष्ट होतो आणि त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
तेव्हा डोळ्यांशी संबंधित ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा. आणि उपचार घ्या. नाहीतर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकता.