

heart attack symptoms and prevention
esakal
झारखंडचे मंत्री सुदिव्य सोनू यांच्या अकाली निधनानंतर हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. छातीत दुखणे किंवा जळजळ होणे याला अनेकदा ‘गॅस’ किंवा ॲसिडिटी समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, काही परिस्थितींमध्ये अशी लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवात असू शकतात. त्यामुळे संशयास्पद लक्षणे जाणवल्यास वेळ न दवडता वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. रांचीच्या रिम्स (RIMS) रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांचे अनमोल प्राण जातात.