
आपल्याकडे हृदयरोग एवढा सामान्य झाला आहे की, कुठल्याही वयातल्या व्यक्तीला सहजपणे हृदयविकार होतो. त्यामुळे हार्ट अॅटॅक येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागलेल्या आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हृदय निरोगी ठेवायचं असेल तर पूरक आणि समतोल आहार गरजेचा आहे. याबाबत हृदयरोगतज्ज्ञ नेमकं काय सांगतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.