

Mehandi Liver Fayde
Sakal
Ayurvedic Research: अनेकजण मेहंदी केसांना लावायला किंवा हातावर लावायला करतात. पण तुम्हाला वाचुन आश्चर्य वाटेल की ही सामान्य मेहंदी यकृताच्या गंभीर आजारावर उचपार करू शकणार आहे. ओसाका मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, या रंगापासून काढलेले रंगद्रव्य, ज्याला लॉसोनिया इनर्मिस असेही म्हणतात, ते विशेषतः यकृताच्या फायब्रोसिसवर उपचार करू शकते. हा एक आजार आहे जो जास्त मद्यपान केल्याने उद्भवतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की यकृत फायब्रोसिस असलेल्यांना सिरोसिस, यकृत निकामी होणे आणि कर्करोगाचा धोका वाढतो. लोकसंख्येच्या 3 ते 4 टक्के लोकांना या आजाराचा सामाना करावा लागतो. याचा शोध कसा लागला आणि याची लक्षणे कोणती हे जाणून घेऊया.