Side Effects and Health Issues Due to Junk Food
sakal
Hidden Dangers Of Processed Foods: आजकाल चटपटीत, पाकीटबंद आणि झटपट मिळणाऱ्या औद्योगिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाने (अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड) लोकांच्या जेवणाची दिशा बदलून टाकली आहे. मोठ्या चवीसाठी हे पदार्थ खाणे सोपे असले, तरी त्यामागे लपलेले धोकेही मोठे आहेत. संशोधनानुसार, अशा पदार्थामुळे स्थूलता, मधुमेह, हृदयरोग आणि यकृतविकार यांचा धोका वाढतो. खरेतर हे पदार्थ तुम्ही नव्हे, तर तेच तुम्हाला खात आहेत, अशी स्थिती आहे.