
Best home remedies for high cholesterol and BP: हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोक आपले प्राण गमावत आहेत. तरुण पिढीनांही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ लागला आहे. त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खांदा दुखणे, पाठदुखी अशी लक्षणे दिसून येतात. जर ही लक्षणे दिसली तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हृदयविकाराचा झटका का येतो? हृदयविकाराची दोन मुख्य कारणे आहेत, ज्यामध्ये वाढलेले एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि वाढलेले रक्तदाब यांचा समावेश आहे. जेव्हा कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये जमा होते आणि कधीकधी ते तुटून हृदयापर्यंत पोहोचते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
उच्च रक्तदाबामुळे शिरा आकुंचन पावतात आणि हृदयावर जास्त दाब पडू लागतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तज्ञांच्या मते स्वयंपाक घरातील पुढील 3 पदार्थ हृदयाचे आरोग्य निरोगी ठेऊ शकता.