High Cholesterol : थंडीच्या दिवसांत आहारात या फळांचा समावेश करा, नसांत जमा झालेलं कोलेस्ट्रॉल सहज वितळेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High Cholesterol

High Cholesterol : थंडीच्या दिवसांत आहारात या फळांचा समावेश करा, नसांत जमा कोलेस्ट्रॉल सहज वितळेल

High Cholesterol : सध्या सगळीकडे कडाक्याची थंडी आहे. अनेकांना थंडीने हृदयविकार उद्भवतोय. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात या काही फळांचा समावेश केलात तर तुमच्या शरीरात साचलेलं कोलेस्ट्रॉल वितळून नसा मोकळ्या होतील.

हिवाळ्यात आपल्याला जीवनशैलीतील काही बदलांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते. हिवाळ्यात त्वचाही कोरडी होत असल्याने तेलकट आणि तुपकट गोष्टी जास्त खाल्ल्या जातात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हलही वाढते. मात्र काही फळांना तुम्ही तुमच्या आहाराचा भाग बववून तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल सुधारू शकता.

सफरचंद

सफरचंदमध्ये (Apple) पॉलिफेनॉल, अँटीऑक्सिडंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. हे शरीरातील चयापचय वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. सफरचंद हे चरबी मोठ्या प्रमाणात कमी करते. हे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर करण्याचे काम करते. त्यामुळे याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

पपई

पपई (Papaya) हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

संत्री आणि लिंबू

संत्री आणि लिंबू (Orange And Lemon) यांसारखी फळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर करतात.

पेर

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पेर अर्थात नाशपाती (Pear) खूप प्रभावी आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध नाशपाती खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

द्राक्षे

द्राक्षे ही पोषक तत्वांनी युक्त आहेत. आपल्या आहाराचा त्याचा समावेश कधीही उत्तम. द्राक्षे कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात. द्राक्षांमध्ये असलेले फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

(Disclaimer: वरील लेख सामान्य माहितीवर असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)