

Epilepsy Risk in Children Due to Excessive Screen Time
sakal
High Screen Exposure Linked to Epilepsy Risk Among Kids: शहरातील बहुतांश कुटुंबात मुले मोबाईल, टिव्ही, संगणकाच्या स्क्रिनसमोर बराच वेळ बसून राहतात. मोबाईल न मिळाल्यास ते जेवत देखील नाही. मोबाईलवरील एखादा गेम निष्णातपणे मुलं खेळत असेल तर पालक त्याचे कौतुक करतात. मात्र 'स्क्रीन टाईम' जास्त असलेल्या मुलांना अपस्मार (Epilepsy) ची जोखीम अधिक असल्याचे निरीक्षण नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदविले आहे. या संघटनेत मेंदूरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञांसह इतरही शाखेतील डॉक्टरांचा समावेश आहे.